न्यूझीलंड विरुध्द पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून अप्रतिम भागीदारी केली. तसेच पहिल्या डावात फलंदाजी करताना २६ व्या षटकात रोहित शर्माने आपले शतक पूर्ण केले. तब्बल ३ वर्षानंतर रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. मात्र या शतकी खेळीदरम्यान रोहित शर्माला कुठल्या गोष्टीची भीती होती. याचा खुलासा शुभमन गिलने केला आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात जोरदार विजय मिळवत भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. तिसरा सामना झाल्यानंतर, राहुल द्रविड सोबत चर्चा करताना शुभमन गिलने सांगितले की, “जेव्हा मी रोहित भाई सोबत फलंदाजी करत होतो, तो ७०-८० धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी डॅरील मिशेल गोलंदाजी करत होता. त्यावेळी रोहित भाईने मला म्हटले की, मला वाटतं हा मला बाद करू शकतो. कारण तो चांगली गोलंदाजी करतोय. मात्र मी चांगले शॉट्स खेळणं सुरू ठेवलं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्यामधून मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं.”
कर्णधार रोहित शर्माने शतक पूर्ण केले. मात्र शतक केल्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. त्याने ८५ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ६ षटकारांचा मदतीने १०१ धावांची खेळी केली. तर शूभमन गिलने १३ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने ११२ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३८६ धावांचा डोंगर उभारला होता. तर न्यूझीलंड संघाचा डाव ४१.२ षटकात २९५ धावांवर संपुष्टात आला.
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव