रवींद्र जडेजा: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने चेपॉक स्टेडियम येथील आपल्या घरच्या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. रवींद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला. त्याने या सामन्यामध्ये तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत कोलकत्ताच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. त्याच्या जादुई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने सामना आपल्या नावे केला. तसेच त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा किताब देऊन गौरविण्यात आले.
जडेजा ने आपल्या फिरकी गोलंदाज वर केकेआरच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले त्याने चार षटकात 18 धावा देऊन तीन गडी बाद केले त्याने अंगक्रुश रघुवंशी, सुनील नरेन आणि व्यंकटेश अय्यर सारख्या धुरंदर युवा फलंदाजांना बाद करत केकेआरचे कंबरडे मोडून काढले.
कोलकत्ताविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने केले खास शतक पूर्ण..
गोलंदाजीत भरीव योगदान देणाऱ्या रवींद्र जडेजाने क्षेत्ररक्षणात अव्वल दर्जाची कामगिरी केली. त्याने या सामन्यांमध्ये दोन झेल पकडले. विसाव्या षटकातील मुस्तफिजूर रहमानच्या पहिल्या चेंडूवर श्रेयस अय्यर याचा अलगदपणे झेल पकडला. त्यानंतर तो एका खास यादीत समाविष्ट झाला. जडेजा आता आयपीएल मध्ये विराट कोहलीसह शंभर झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने 242 सामन्यात 110 झेल पूर्ण केले आहेत.
- IPL 2024: रवींद्र जडेजाने केली एमएस धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी, सामन्याच्या हिरो ठरल्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया…!
या यादीत दुसऱ्या स्थानावर सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैना आहे. त्याने 265 सामन्यात 109 जेल पकडले आहेत. त्याने 2022 मध्ये आयपीएल मधून निवृत्ती स्वीकारली होती. कायरन पोलाड यांनी आयपीएलच्या कारकिर्दीमध्ये 103 झेल पकडले आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर रोहित शर्मा चा नंबर येतो. रोहितने 247 सामन्यात 100 झेल पकडले आहेत. जडेजाने 231 सामन्यात 100 झेल पकडण्याचा विक्रम केला होता. सीजन संपेपर्यंत कोणता खेळाडू कोणाला ओव्हरटेक करून पुढे जातो हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.
सामन्या विषयी बोलायचं झाले तर सीएसकेने चेपॉकच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये केकेआरचा सात विकेट राखून पराभव केला. हा घरच्या मैदानावर सीएसकेचा सलग तिसरा विजय आहे तर केकेआरचा या हंगामातला पहिला पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरचा संघ 137 धावांवर आटोपला. पाहुण्या संघाचे फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसून आले.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.