नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.

Untitled design 4

 

 

 

आपल्या देशातील बहुतांशी लोक क्रिकेट खेळाला सर्वाधिक पसंती देत आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे मोठ्या प्रमाणात वेड आहे.

 

तर मित्रांनो आज रणजी ट्रॉफी सामन्यात जबदस्त खेळी केलेल्या शार्दुल ठाकूर ने अनेक चाहत्यांचे हृदय जिंकले आहे आक्रमक गोलंदाजी ने सगळ्यांना मोहात टाकले आहे.

 

 

भारतीय संघाचा ऑल राऊंडर खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूर ला ओळखले जाते. शार्दुल ठाकूर ने अतिशय मेहनत करून आज त्याने आपले नाव कमवले आहे. शार्दुल ठाकूर ने आज झालेल्या रणजी सामन्यात 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्या आहेत. हा रणजी ट्रॉफी सामना मुंबई मधील शरद पवार क्रिकेट अकादमी विरुद्ध आसाम यांमध्ये झाला होता.

 

 

आसाम चा बाजार उठवला:-

शार्दुल ठाकूर ने नाद खुळा गोलंदाजी करत आसाम संघाला चांगलीच धूळ चारलेली आहे. चक्क शार्दुल ठाकूर ने 6 बॉल मध्ये 6 विकेट घेऊन आसाम विरुद्ध चा सामना अगदी सहजपणे गुंडाळून आसाम संघाचा बाजार उठवला आहे. शार्दुल ठाकूर ने आसाम संघाला अवघ्या 21 धावा देऊन 6 विकेट्स घेऊन आसाम संघाला धूळ चारली आहे. शार्दुल ठाकूर च्या आक्रमक गोलंदाजी मुळे आसाम ला पहिला डाव अवघ्या 84 धावांवर थांबवावा लागला.

 

 

6 बॉल 6 विकेट्स:-

शार्दुल ठाकुरने आपल्या गोलंदाजी च्या कौशल्याने आसामच्या परवेज मुसरफ, सुमीत घाडीगावकर, कॅप्टन देनिश दास, कुणाला सर्मा, सुनिल लचित आणि दिबकर जोहरी या 6 फलंदाजांना घराचा रस्ता दाखवला आहे.

images 2

 

मुंबई प्लेईंग ईलेव्हन संघाचे खेळाडू:-

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.

 

 

 

आसाम प्लेईंग ईलेव्हन :-

परवेज मुसरफ, राहुल हजारिका, अब्दुल अजीज कुरैशी, राहुल सिंग, डेनिश दास (कॅप्टन), दिबाकर जोहरी, सुनील लचित, सुमित घाडीगावकर (विकेटकीपर), कुणाल सरमा, अभिषेक ठाकुरी आणि साहिल जैन.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-  जाणून घ्या, कोण आहे चेन्नई सुपर किंग चा बाप ? 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *