आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनली आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त कॅच, सर्वात मोठा स्कोअर इत्यादी रेकॉर्ड तुम्ही वाचले किंवा बघितले असतील.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या रेकॉर्ड बद्दल सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. तर केवळ 6 धावांवर ऑल आऊट झालेला संघ सुद्धा आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी स्कोअर वर ऑल आऊट झालेला हा रेकॉर्ड आहे.
क्रिकेटची सुरुवात होऊन खूप वर्षे उलटून गेली आहेत. यादरम्यान क्रिकेटच्या खेळात अनेक धक्कादायक रेकॉर्ड्स सुद्धा अनेक खेळाडूंनी बनवली आहेत, ज्यांना जाणून लोकही हैराण झाले आहेत. कसोटी क्रिकेट हे ५ दिवस खेळले जाते.
या दरम्यान अनेक खेळाडू मोठे मोठे डाव खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्यांच्या संघाची धावसंख्या वाढवायची असते. परंतु अनेक वेळा असे देखील घडते की संघ अत्यंत कमी गुणांवर बाद होतात. जर का खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर संघ हा कमी धावांवर बाद होतोच.
आजतागायत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अनेक संघ हे 20 पेक्षा कमी धावा काढून बाद झाले आहेत. पण क्रिकेटच्या इतिहासात असे एकदाच घडले आहे जेव्हा एखादा संघ 06 धावांवर ऑलआऊट झाला असेल हे बऱ्याच लोकांना खोटं वाटेल परंतु हे सत्य आहे.
212 वर्षांपूर्वी 1810 सालामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध बीएस हा संघ केवळ 6 धावा करून बाद झाला होता. संपूर्ण संघ हा 6 धावांवर बाद झाल्यामुळे क्रिकेट इतिहासात यांची नोंद सुद्धा झाली आहे. क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वात लहान धावसंख्या आहे.
त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये एका षटकात 4 चेंडू टाकले जात होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीएस संघाने पहिल्या डावात 137 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 100 धावा करून गारद झाला होता. त्यामुळे BS संघ हा 37 धावांनी आघाडीवर होता.
परंतु दुसऱ्या डावात बीएस संघ केवळ 6 धावाच बनवू शकला. आणि स्वताच्या नावावर एक लज्जास्पद रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या डावात बीएस संघाने केवळ 6 धावा केल्यामुळे त्यांची पडझड सुरू झाली. या सामन्यात इंग्लंड संघासमोर विजयासाठी 44 धावांचे लक्ष्य होते. हे 44 धावांचे लक्ष इंग्लंड संघाने 4 विकेट घालवून अत्यंत सहजपणे पूर्ण केले. आणि विजयी झाले.