टीम इंडिया च्या रोहित शर्मा ने या 6 सामन्यात 6 वेळा शतक मारले तरी सुद्धा भारतीय संघाला अपयश मिळाले होते. जाणून घ्या सविस्तर

वनडे च्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने भारत देशाचा प्रभाव करत १-० अशी खेळी लढली. टीम इंडिया चा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा ने १३३ रन्स करून शतक मारले मात्र ते वाया गेले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोहित लढला मात्र शेवटी हाती अपयश आले. शतक करण्याची रोहित ची ही पहिली वेळ नाही मात्र संघाला पराभूताला सामोरे जावे लागले. आता पर्यंत रोहित ने ६ शतक मारले आहेत जे की ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध ४ वेळा तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध व झिम्बाब्वेविरुद्ध १-१ असे ६ वेळा रोहित ने शतक मारले आहे. मात्र या ६ ही वेळा टीम इंडिया ला पराभूताला सामने जावे लागले.
११४ विरुद्ध झिम्बाब्वे :-
भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा ने ११९ बॉल मध्ये ११४ धावा करून भारताला २८५/५ धवापर्यंत पोहचवले. रोहित शर्मा ने आपल्या या शतकामध्ये जवळपास ६ चौकार तर ४ सिक्स मारले. हा सामना २८ मे २०१० साली बुलावायो या ठिकाणी झाला असून या सामन्यामध्ये भारताला पराभूत सहन करावा लागला जे की झिम्बाब्वेने ६ गडी राखून आपल्या नावी विजय प्राप्त करून दाखवला.
१३८ विरुद्ध ऑस्ट्रेलिया :-
रोहित शर्माने मेलबर्न च्या क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेला सामन्यांमध्ये टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध १३८ धावा ठोकल्या असून टीम इंडिया ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध या सामन्यात ५० ओव्हर मध्ये २६७/८ अशा धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलिया टीम ने ४ गडी राखून हे टारगेट गाठले आणि भारत संघाला पराभूताला सामोरे जावे लागले. रोहित शर्मा च्या अजून एक शतकावर पाणी पडल्याचे दिसून येत आहे.
१५० विरुद्ध दक्षिण आफ्रिका :-
टीम इंडिया चा बॅट्समन रोहित शर्मा ने २०१५ मध्ये कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका टीम विरुद्ध १५० धावा करत आपले अजून एक शतक नावे केले. टीम इंडिया ने या वेळी दक्षिण आफ्रिका टीम विरुद्ध २९८ धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिका टीम ने हे लक्ष गाठत टीम इंडिया चा पराभूत केला.
171* नाबाद ऑस्ट्रेलिया विरुद्ध :-
२०१६ मध्ये रोहित शर्मा ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७१ धावा करून शतक झळकावले होते. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३१० धावांचे टारगेट ठेवले होते. जे की ऑस्ट्रेलिया टीम ने ४ बॉल राखत हे लक्ष्य पूर्ण केले व ५ विकेट्स राखत. रोहित शर्मा चे हे शतक सुद्धा व्यर्थ गेल्याचे आपणास दिसून येत आहे.
१२४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया :-
रोहित शर्मा ने २०१६ मध्ये ब्रिस्बेनमध्ये १२७ बॉल मध्ये १२४ धावची खेळी केली असून त्यामध्ये ११ चौकार आणि ३ सिक्स मारले. मात्र टीम इंडिया ला ऑस्ट्रेलिया समोर पराभवाचा सामना करावा लागला. जे की सलग दुसऱ्या वेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध जरी शतक कमावले असले तरीही काही फायदा झाला नाही. भारताने ऑस्ट्रेलिया समोर ३०९ धवांचे टारगेट ठेवले होते मात्र ऑस्ट्रेलिया ने हे टार्गेट पूर्ण केले.
१३३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया :-
रोहित शर्मा ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुन्हा एकदा १३३ धावा केल्या मात्र तरी सुद्धा टीम इंडिया ला पराभूत स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया ने भारताचा २४ धावांनी पराभव केला असल्याचे दिसले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या पराभवाची ही चौथी वेळ असल्याचे दिसून येत आहे. रोहित शर्मा ने सलग ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध चार शतके मारून सुद्धा काही फायदा न झाल्याचे दिसून येत आहे.