सर्वाधिक पराभव: विश्वचषकात लंकेच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद ; वाचा भारताचे किती झालेत पराभव..

 

विश्वचषकात  सर्वाधिक पराभव: विश्वचषक 2023 मध्ये सुरू असलेल्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवसह श्रीलंकेच्या नावावर एका नको असलेल्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पराभूत होणारा संघ म्हणून आता श्रीलंका संघ ओळखला जाईल. विश्वचषकात सर्वाधिक (45) सामन्यात पराभवाची नोंद श्रीलंकेच्या नावे झाली आहे. 1996 साली अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.

90 च्या दशकात भल्याभल्या संघांना पाणी पाजून सामन्यात उलटफेअर करण्यात माहीर असलेला झिम्बाबेचा संघ, विश्वचषकातील 42 सामन्यात पराभूत झाला आहे. विश्वचषकात सर्वाधिक सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. हा संघ एकदाही विश्वचषक जिंकू शकला नाही. यंदाच्या विश्वकप स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला नाही.

AUS vs SL: ऑस्ट्रेलियाने केला जागतिक विक्रम; अशी कामगिरी करणारा बनला जगातला पहिला देश

१९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. क्लाइव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीज संघाने १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकले होते तर १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी भारतीय संघाने पराभव केला होता. एक दशकाहून अधिक काळपर्यंत क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्टइंडीज च्या संघाने विश्वचषकात 35 सामने गमावले आहे.

क्रिकेटचा शोध ज्यांनी लावला तो देश म्हणजे इंग्लंड. या देशाला केवळ एकदाच म्हणजे 2019 साली विश्वचषकावर नाव करता आले. विश्वचषकात इंग्लंडच्या संघाने 34 वेळा पराभवाची नामुष्की ओढावली आहे. गतवेळचा चॅम्पियन असलेलं इंग्लंडचा संघ मात्र यंदाच्या विश्वचषकात फॉर्म दिसून येत नाही.

AUSvsSL live

स्टार खेळाडूंनी सजलेल्या न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर आपले नाव कोरता आले नाही. या संघाला विश्वचषकांमध्ये विजयाने तीनदा हुलकावणी दिली आहे. न्युझीलँड संघाचा विश्वचषकात एकूण 33 सामन्यात पराभव झाला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या तुफान फार्मात असून यंदाच्या विश्वचषकात तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मागील विश्वकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने कडून त्यांचा निसटता पराभव झाला होता.

विश्वचषकावर एकदाच नाव कोरणाऱ्या पाकिस्तान संघाचा 33 सामन्यात पराभव झाला आहे. इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली 1992 साली या संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. 1999 साली या संघाने वसीम आक्रमच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.

विश्वचषकावर दोनदा आपले नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचा 29 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. 1999 सालच्या विश्वचषकात भारतीय संघाचे सर्वाधिक पराभव आहेत. 2007 साली वेस्टइंडीजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत साखळी सामन्यातच पराभूत झाला होता.

आयसीसी वनडे रँकिंग मध्ये सातव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशचा संघ विश्वचषकातील 27 सामन्यात पराभूत झाला. विश्वचषकात सर्वात कमी पराभव या संघाचे झालेले आहेत. हा संघ देखील एकदाही विश्वचषक जिंकण्यामध्ये यशस्वी ठरला नाही.

सर्वाधिक पराभव: विश्वचषकात लंकेच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद;वाचा भारताचे किती झालेत पराभव..

विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे तब्बल 25 सामन्यात पराभव झाले आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत हा संघ विजयासाठी धडपडत आहे.

विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी पराभव झालेल्या संघाच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकूण 23 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या संघाला एकदाही विश्वचषकावर आपले नाव करता आले नाही.