SL vs NED: अखेर श्रीलंकेने मिळवला विश्वचषक स्पर्धेतला पहिला विजय; नेदरलँडचा 5 गडी राखून केला पराभव..

SL vs NED: विश्वकप 2023 (World Cup 2023) मधील 19 व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडचा पाच गडी राखून पराभव केला. लखनऊच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नेदरलँडने 262 धावा केल्या. प्रतिउत्तरात श्रीलंकेने पाच गड्यांच्या मोबदल्या 263 धावा करत विजय मिळवला. या स्पर्धेतला श्रीलंकेचा हा पहिला विजय आहे. या विजयासह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत नवव्या तर अफगाणिस्तानचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

SL vs NED: अखेर श्रीलंकेने मिळवला विश्वचषक स्पर्धेतला पहिला विजय; नेदरलँडचा 5 गडी राखून केला पराभव..

SL vs NED: लक्षाचा पाठलाग करतांना श्रीलंकेची निराश सुरवात 

नेदरलँडने दिलेल्या 263 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामवीर कुसल परेरा पाच तर कुसल मेंडिस 11 धावा करून बाद झाला. श्रीलंकेने 52 धावांवर दोन गडी गमावल्यानंतर पुनरागमन केले. निसांका आणि समरविक्रमाने अर्धशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली.

निसांका 54 धावांवर माघारी परतला. चारिथ असलंका आणि समरविक्रमाने 77 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला विजयाच्या जवळ नेले. असलंका 44 धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा 30 धावा करून बाद झाला. मात्र, समरविक्रमा एक बाजू धरून खेळत होता आणि विजय श्रीलंकेला विजय मिळवून देऊनच तो माघारी परतला. नेदरलँड तर्फे आर्यन दत्तने तीन आणि मिक्रेन,अकरमन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

सामन्याच्या सुरुवातीला नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. 6 बाद 91 अशी नाजूक अवस्था झाली होती. सातव्या विकेटसाठी झालेल्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर नेदरलँड ने एक सन्मान जनक धावसंख्या उभारली. सायब्रांड आणि वन बीक च्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर नेदरलँड ने 262 धावा करण्यात यशस्वी ठरला. अखेर नेदरलँड ने 49.4 षटकात सर्वबाद 262 धावा केल्या.

SL vs NED: अखेर श्रीलंकेने मिळवला विश्वचषक स्पर्धेतला पहिला विजय; नेदरलँडचा 5 गडी राखून केला पराभव..

नेदरलँड चा फलंदाज सायब्रेड अँगल ब्रेकट आणि लोगन वॅ!न बीक यांनी सातव्या गड्यासाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी रचली. सायब्रेड याने 82 चेंडूत 70 धावांची खेळी केले यात चार चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. त्याला लोगनने भरपूर साथ दिली. त्याने 75 चेंडूत 59 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यात एक चौकार आणि एक षटकारांचा समावेश होता. नेदरलँडकडून कोणत्याही विकेटसाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली.

SL vs NED: ..आणि अखेर श्रीलंकेला पहिला विजय मिळाला.

श्रीलंकेकडून दिलशान मधुशंका याने 49 धावा देत चार गडी बाद केले तर रजिता याने 50 धावा चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. एम. तीक्षणा याने 44 धावात एकमेव गडी बाद केला. नेदरलँडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासारखा चमत्कार या सामन्यात करता आला नाही.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *