Viral Video: अफगाणिस्तानच्या विजयानंतर एक चिमूर्डा ‘मुजिब उर रहमानच्या’ गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

मुजिब उर रहमान ENGvsAFG:

मुजिब उर रहमान: विश्वचषकाच्या तेराव्या समन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी दारुण पराभव केला. 2019 सालचा गत विजेता राहिलेल्या इंग्लंडच्या संघाला पराभव केल्याने अफगाणिस्तानचा आनंद गगनात मावेनासा झाला. इंग्लंडवर पराभवाची नामुष्की ओढावेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. अफगाणिस्तानच्या फिरकी पुढे इंग्लंडचा डाव पत्त्यांसारखा गडगडून गेला.

या सामन्याचा हिरो ठरला तो फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान. त्याने दहा षटकात 51 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद करत सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लावला. यासह सामन्यात 16 चेंडूत 28 धावांची महत्त्वपूर्ण छोटेखानी खेळी केली. त्याच्या याचमकदार कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुजीबने त्याच्या या पुरस्काराची रक्कम अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांना समर्पित केले. या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुजीबला कोणत्या संघाने खरेदी केली नाही. आयपीएल मध्ये भाव न मिळालेल्या या खेळाडूने इंग्लंडच्या संघाला मात्र चांगलेच घाव दिले आहे.

मुजिब उर रहमान

मुजिब उर रहमानचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

सामन्यानंतर अफगाणिस्तानचा एक छोटा फॅन मुजीब च्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होता. त्यानंतर मुजीबने ने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत शांत केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्या लहान मुलाच्या डोळ्यातून अश्रू पाहून हा विजय अफगाणिस्तान साठी किती महत्त्वाचा होता हे लक्षात येते. डिपेंडिंग चॅम्पियन इंग्लंडचा असा दारूण पराभव होईल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. अफगाणिस्तानचा विजय मात्र थेट चाहत्याच्या काळजाला भिडणारा होता.

अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात 3 सामन्यापैकी पहिला विजय मिळवता आला आहे. बांगलादेश आणि भारत बरोबर झालेल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. तसेच आतापर्यंतच्या विश्वचषक इतिहासात त्यांचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांना विश्वचषकात सलग 14 पराभव पहावे लागले आहेत.Eng vs AFG: अफगाणिस्तानी फिरकीपट्टू पुढे साहेबांनी टेकले गुडघे: पराभव लागला इंग्लंडच्या जिव्हारी..

अफगाणिस्तानचा पुढचा सामना 18 ऑक्टोंबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. तर इंग्लंडचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी इंग्लंडकडे भरपूर वेळ आहे. तो संघ पुन्हा कसा कमबॅक करणार याकडे चाहत्याचं लक्ष लागून राहिले आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ

विश्वचषक 2023 गुणतालिका (world cup 2023 point table)

गुणतालिकेवर नजर टाकली असता भारत तीन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात तीन विजयासह सहा गुणांची नोंद झाली आहे. न्युझीलँड ने देखील भारता इतकेच तीन सामने जिंकून सहा गुणांची कमाई केली आहे. नेट रन रेट च्या हिशोबानुसार भारत-न्यूझीलंडच्या पुढे आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेश विरुद्ध पुणे येथे 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी.