Viral Video: सामना पाहण्यासाठी व्हीलचेअरवर पोहचलेल्या चाहतीला स्मृती मंधानाने दिले विशेष गिफ्ट, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0
23
Viral Video: सामना पाहण्यासाठी व्हीलचेअरवर पोहचलेल्या चाहतीला स्मृती मंधानाने दिले विशेष गिफ्ट, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
ad

Smriti Mandhana Viral Video: महिला आशिया चषक 2024 मध्ये, टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. या विजयामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. संघाला पुढील 2 पैकी 1 सामना जिंकावा लागेल. हा सामना UAE आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये दणदणीत विजय तर नोंदवलाच पण मॅचनंतर टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूने तिच्या अनोख्या स्टाइलमुळे बरीच चर्चा केली. या स्टार खेळाडूने आपल्या क्रिकेट फॅन्सला एक फोन भेट दिला आहे, ज्याचे खूप कौतुक होत आहे.

टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) तिची श्रीलंकन ​​फॅन’ अदिशा हेराथ’ला हा फोन भेट दिला आहे. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर तो व्हायरल झाला. स्मृती मानधनाच्या या स्टाइलचे लोक कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती मानधना व्हील चेअरवर सामना पाहण्यासाठी आलेल्या आदिशा हेराथ या छोट्या चाहतिला मोबाईल फोन भेट देत आहे. टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनकडून खास गिफ्ट मिळाल्यानंतर मुलगी किती खूश आहे, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. स्मृती मंधानानेही या छोट्या चाहत्यासोबत फोटोसाठी पोज दिली.

व्हिडिओच्या शेवटी, आदिशाच्या आईने सांगितले की,

तिची मुलगी स्मृती मंधानाची खूप मोठी फॅन आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता, पण मुलीच्या सांगण्यावरून ती इथे आली आणि तिचा दिवस बनला. आदिशाची आई म्हणाली, ‘आम्ही अचानक सामना पाहण्यासाठी आलो. माझ्या मुलीला मॅच बघायची होती. आम्ही टीम इंडियाच्या स्मृती मानधना मॅडमला भेटलो आणि तिने फोन माझ्या मुलीला दिला. याचा विचारही आम्ही केला नव्हता. माझी मुलगी भाग्यवान आहे की तिला मानधना मॅडमकडून भेट मिळाली. मी खूप आनंदी आहे आणि त्यांचे आभारी आहे’

स्मृतीने मॅच विनिंग इनिंग खेळली.

Viral Video: सामना पाहण्यासाठी व्हीलचेअरवर पोहचलेल्या चाहतीला स्मृती मंधानाने दिले विशेष गिफ्ट, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

या सामन्यात स्मृती मानधनाने 31 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत तीने 9 चौकार मारले. स्मृती मंधानाच्या या खेळीमुळे टीम इंडियाने ३५ चेंडू बाकी असताना पाकिस्तानचा ७ विकेट राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत सर्व गडी गमावून 108 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 14.1 षटकात 3 गडी गमावून 109 धावा करत सामना जिंकला. आता टीम इंडियाचा सामना यूएईशी होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करेल.


हेही वाचा:

Champion Trophy 2025: गौतम गंभीरचा मोठा निर्णय, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे 15 खेळाडू जाणार पाकिस्तानमध्ये..!

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच जखमी झाले होते हे 5 कसोटीपटू, एकाचे तर करिअरच पहिल्या सामन्यात संपले..!