भारतीय संघाचा नवीन खेळाडू उम्रान मलिक हा सध्या सतत चर्चेत असतो. या मागे कारण ही तसेच आहे. उम्रान मलिक हा भारतीय संघाचा अत्यंत तुफानी गोलंदाज आहे. तसेच भारतीय संघाचा सुपर स्टार गोलंदाज उम्रान मलिक ला वेगाचा बादशहा म्हणून सुद्धा संबोधले जात आहे.

उम्रान मलिक हा 150kmph च्या वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय संघाचा एकमेव गोलंदाज आहे. उम्रान मलिक ला पाकिस्तानी अतिगती गोलंदाज शोएब चा रेकॉर्ड मोडायचा आहे.
उम्रान मलिक ने वयाच्या 25 व्या वर्षी भारतासाठी 8 एकदिवसीय आणि 8 T20 सामने खेळले आहेत. आणि या सामन्यादरम्यान उम्रान मलिक ने 24 विकेट घेतल्या आहेत. तसेच उम्रान मलिक हा भारतीय संघाचा विकेट टेकर गोलंदाज आहे.
तसेच उम्रान मलिक ला अनेक दिग्गज खेळाडू पाठिंबा देत आहेत तसेच पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रम चा सुद्धा याला सपोर्ट आहे. याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडू च्या ओठांवर सध्या उम्रान मलिक चे च नाव आहे.
सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असताना पाकिस्तानी खेळाडू सोहेल खान याच्या पोटात दुखू लागले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये याचे सोहेल खान ने प्रसिद्ध होण्यासाठी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली चा बाप काढला होता.
तसेच उम्रान मलिक ची तुलना गल्ली मधील क्रिकेट खेळण्यार्यांमध्ये केली आहे. तसेच सोहेल खान ने असे विधान केले की पाकिस्तान च्या गल्लीबोळात उम्रान मलिक सारखे 10 ते 15 गोलंदाज असतील. शोएब ची बरोबरी कोणताच गोलंदाज करू शकत नाही.
तसेच उम्रान मलिक सारख्या गोलंदाजांचा पाकिस्तान लाहोर मद्ये भरणा आहे. तसेच शोएब चा गोलंदाजी चा रेकॉर्ड फक्त गोलंदाजी मशीन च तोडू शकते असे सुद्धा म्हंटले आहे.