‘विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची गरज’, दिग्गजाचा विराटला मोलाचा सल्ला
Sourav Ganguly advice for Virat Kohli

Viश्रीलंका आणि न्यूझीलंड संघाला पराभूत केल्यानंतर, आज भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध टी -२० मालिकेत २ हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा सारखे दिग्गज खेळाडू ही मालिका खेळताना दिसून येणार नाहीये.
हे खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे.
सौरव गांगुलीने स्पोर्टस् तकला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “हो, नक्कीच त्याने श्रीलंका आणि बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली. मात्र त्याला कसोटी क्रिकेटमध्ये देखील सुधारणा करावी लागणार आहे.
कारण संपूर्ण संघ त्याच्यावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द होणारी ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. मला नक्कीच खात्री आहे की, ही मालिका रोमांचक होईल. कारण दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. तसेच हे दोन्ही संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील खेळू शकतात.”
गतवर्षी झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत विराट कोहलीला केवळ एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर तो पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने जोरदार कामगिरी केली आणि ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.
विराटने आतापर्यंत खेळलेल्या १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९ च्या सरासरीने ८००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.