भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी केली आहे. यासह मालिकेत २-० ची आघाडी देखील घेतली आहे. दरम्यान ही मालिका जिंकण्याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मालिका जिंकण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय संघ ही मालिका ४-० ने आपल्या नावावर करणार. जर ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकायची असेल तर उच्चस्तरीय खेळ करावा लागेल. सौरव गांगुली यांनी म्हटले की, ” मला वाटतं ४-०,भारताला पराभूत करणं नक्कीच ऑस्ट्रेलिया संघासाठी कठीण असणार आहे. या परस्थितीत भारतीय संघ मजबूत संघ आहे.
९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मालिकेत आतापर्यंत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. नागपूर कसोटीत भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर दिल्ली कसोटीत ६ गडी राखून विजय मिळवला होता.

या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. तर तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला ही मालिका नावावर करण्याची संधी असणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची देखील संधी असणार आहे.
हे ही वाचा..
क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! अवघ्या ३१५ रुपयांत मिळतेय विराट अन् रोहित शर्माला भेटण्याची संधी..