ENG vs RSA: दक्षिण आफ्रिकेपुढे गत विजेत्या इंग्लंडच्या संघाने टेकले गुडघे; तब्बल 229 धावांनी झाला सर्वात मोठा पराभव..

ENG vs RSA: आयसीसी विश्वचषक 2023 (Worldcup 2023) मध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात गतविजेता इंग्लंडचा 229 धावांनी पराभव झाला. वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा हा सर्वाधिक धावांनी झालेला पराभव आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या सामन्यात 221 धावांनी पराभव झाला होता. स्पर्धेतला हा इंग्लंडचा तिसरा पराभव आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बिग अपसेट! दक्षिण आफ्रिकेला घरचा भेदीच ठरला पराभवास कारणीभूत.

नेदरलँड विरुद्ध झालेल्या पराभवापासून धडा घेत दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीच पाचारण केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली चौथ्याच चेंडूवर क्विंटन डीकॉक बाद झाला. त्यानंतर रिजा आणि दुसेन यांनी संघासाठी पावर प्ले मध्ये 59 धावा केल्या.रीजा हेंड्रिक्स (85) आणि रसी वान डर डुसेन (60) धावा काढून चांगली सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ते दोघेही बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळू लागला.

या सामन्यात कर्णधार टेंबा बावुमा हा तब्येत ठीक नसल्यामुळे या सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर संघाच्या नेतृत्वाची धुरा ऍडम मारक्रम याने सांभाळली. क्लासेन याला चालू सामन्यात पायाला क्रॉम्प येत होते तरी देखील तो खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 47व्या षटकात मार्क वुड याला एक षटकार आणि चौकार ठोकून शतक पूर्ण केले.

ENG vs RSA: क्लासेन आणि यानसेन ने केली जबरदस्त फटकेबाजी..

क्लासेन आणि यानसेन यांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 10 षटकात 143 धावा काढल्या. ज्यात शेवटच्या पाच षटकात 84 धावा काढल्या गेल्या. हेंनरीच कालसेन याने त्याच्या कारकिर्दीतले चौथे तर यंदाच्या वर्षातले हे तिसरे शतक ठोकले. मार्को यानसेन 42 चेंडूत नाबाद 75 धावांची आक्रमक खेळी केले. ज्यात तीन चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. या दोघांनी मिळून 77 चेंडूत 151 धावांची पार्टनरशिप केली.

डेविड मिलर 5 , क्विंटन डिकॉक 4 आणि गेराल्ड कोएत्जे 3 धावा काढून स्वस्तात बाद झाले. केशव महाराज एक धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून रिस टॉल्फी याने तीन विकेट घेतले. गस एटिंकसन आणि आदिल रशीद याना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.

इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक धावा काढल्या. विशेष म्हणजे इंग्लंडकडून एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. दहाव्या नंबर खेळायला आलेल्या मार्कने सर्वाधिक नाबाद 43 धावांचे योगदान दिले. नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या गस एटीकसन याने 35 धावा काढल्या.

ENG vs RSA: दक्षिण आफ्रिकेपुढे गत विजेत्या इंग्लंडच्या संघाने टेकले गुडघे; तब्बल 229 धावांनी झाला सर्वात मोठा पराभव..

हॅरी ब्रूक 17, जोस बटलर 15, डेविड विली 12, जॉनी बेयरस्टो आणि आदिल रशीद 10-10 रन धावा काढून बाद झाले. डेविड मलान 6, बेन स्टोक्स 5 आणि जो रूट 2 धावा काढून स्वस्तात बाद झाले. रीस टॉप्ली दुखापतीमुळे फलंदाजी करण्यास उतरला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्जे याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. लुंगी एंगिडी आणि मार्को यानसेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांना एक गडी बाद करण्यात यश आले.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *