विश्वचषक 2023 मधील 26 वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनऊच्या मैदानावर झाला. ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दहा गुणांसह पहिल्या स्थानावर स्थान पटकावले. तर दुसरीकडे विश्वचषकामधील पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे. या पराभवासह पाकिस्तानचा स्पर्धेतला खेळ खल्लास झाला. पाकिस्तान सेमी फायनल च्या रेस मधून बाहेर पडला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या महत्वपूर्ण सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ 46.4 षटकात 270 धावा करू शकला. यामध्ये कर्णधार बाबर अझम याने 50 सऊद शकील याने 52 तर शादाब खान यांनी 43 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण त्यांच्या या धावा पाकिस्तानच्या विजयाच्या कामी आल्या नाहीत.
पाकिस्तानचे फलंदाज तरबेज शमशीच्या फिरकी गोलंदाजी पुढे लोटांगण घातले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज तर्फे शमशी याने सर्वाधिक चार विकेट घेतले. पाकिस्तानचा संघ सुरुवातीपासूनच दबावांमध्ये खेळत होता. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या मधली फळी कापून काढली. पाकिस्तानच्या फलंदाजांना 50 षटके देखील खेळू दिले नाही. मार्को यान्सेन याने तीन विकेट तर गेराल्ड कोएत्जी ने 2 आणि लुंगी एनगिडी 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
विजयाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने वेगात सुरुवात केली. क्विंटन डिकॉक आणि कर्णधार टेंबा बावूमा यानी तीन षटकात तीस धावा काढल्या. डीकॉक हा 24 धावांवर टेंबा 28 धावा काढल्या. एडन मार्करम याने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. शतक पूर्ण करण्याच्या नादात मोठा फटका मारत असताना तो बाद झाला आणि त्यानंतर सामन्यात खूप मोठा ट्विस्ट निर्माण झाला. शेवटच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी झटपट विकेट बाद केल्यानंतर सामना स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. केशव महाराजने चौकार मारून अखेर पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला.
या पराभवमुळे पाकिस्तानचा संघ सेमी फायनलच्या रेस मधून पूर्णता बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून ही पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले. यात शाहीन शहा अफ्रीदी याने 3 विकेट तर हारीस राऊफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि उस्मा मिर याने प्रत्येक दोन गडी बाद केले. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा आपल्याच गोलंदाजांवर चिडत असल्याचे दिसून आला.