ऐकून खेळाडू 25, विदेशी खेळाडू 8.. काही जबरदस्त अष्टपैलू तर काही खतरनाक गोलंदाज, लिलावानंतर दिल्ली कैपिटल्सची वाढली ताकत, आयपीएल 2023 साठी असा असेल अंतिम 11 खेळाडूंचा संघ..
काही दिवसापूर्वीच आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव केरळ मधील कोच्ची येथे पार पडला. ज्यात सर्वच फ्रेन्चायझीने आपल्या गरजेनुसार खेळाडूंना टार्गेट करून आपल्या संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. तत्यातील काही संघाना आपल्या आवडीचे खेळाडू बोली लावून आपल्याकडे घेण्यात यश सुद्धा आले तर काही संघांना पैश्यांची कमतरता आणि इतर कारणांमुळे त्यांचे आवडते खेळाडू आपल्या संघात घेता आले नाही.
आता मात्र या लिलावानंतर जवळपास हे निश्चित झाले आहे की, कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार आणि त्याची संघात काय भूमिका असेल. आजच्या या लेखात आपण लिलावानंतर दिल्ली कैपिटल्सचा संघ नेमका कसा दिसतोय? आणि कोणकोणते भारी खेळाडू दिल्लीच्या ताफ्यात आहेत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया आजच्या या लेखाला.

आयपीएलच्या मिनी ऑक्शन नंतर आता दिल्लीच्या संघात 25 खेळाडू आहेत. ज्यात अनेक स्टार खेळाडूंची भारती आहे.
लिलावात दिल्लीने आपली फलंदाजी आणखी मजबूत करण्याचा विचार केला. तसेच भारतीय गोलंदाज विकत घेऊन वेगवान गोलंदाजीचे पर्याय वाढवले. लिलावानंतर संघ संतुलित दिसत आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यासह संघ व्यवस्थापन कोणत्या प्लेइंग-11 वर विश्वास व्यक्त करतात हे पाहावे लागेल. मधल्या फळीत रिले रुसो संघासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
एकूण खेळाडू: 25
परदेशी खेळाडू : ८
या लिलावात खरेदी करा: 5
राखून ठेवलेले: 20
Signing off with the Class of 2023 ✅
Bring on the #IPL2023 🔥#YehHaiNayiDilli #TATAIPLAuction #IPL2023Auction pic.twitter.com/wP0MzoE8BE
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 23, 2022
लिलावामध्ये या खेळाडूंना केले खरेदी..
मुकेश कुमार (भारतीय गोलंदाज) 5.50 कोटी रुपये, रिले रुसो (विदेशी फलंदाज) 4.60 कोटी रुपये, मनीष पांडे (भारतीय फलंदाज) 2.40 कोटी रुपये, फिल सॉल्ट (विदेशी यष्टीरक्षक) 2 कोटी रुपये, इशांत शर्मा (भारतीय गोलंदाज) 50 लाख रुपये
लिलावाआधी कायम ठेवलेले खेळाडू: अमन खान, एनरिच नोर्टजे, अक्षर पटेल, चेतन साकारिया, डेव्हिड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ललित यादव,, मिचेल मार्श, मुस्तफिजुर रहमान, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ऋषभ पंत, सरफराज खान, खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुल.
दिल्लीच्या कर्णधारपदी रिषभ पंत कायम असून मुख्य कोच रिकी पोंटिंग आहेत. विदेशी खेळाडूंची संख्या दिल्लीच्या संघात समतोल घडवून आणणारी दिसतेय. म्हणूनच दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये बरेच विदेशी खेळाडू मैदानावर दिसू शकतात. आता दिल्लीचा संघ येत्या आयपीएलमध्ये या खेळाडूंच्या भरोशावर कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आयपीएल 2023 असा असू शकतो दिल्लीचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ:
पृथ्वी शॉ,डेव्हिड वॉर्नर,रिले रुसो, ऋषभ पंत, सरफराज खान,अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, खलील अहमद ,लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान