ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
SRH vs KKR: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL 2024 आता प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणारे चार संघ, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पहिला क्वालिफायर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत आणि विजयाचे दावेदार आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का? की आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये एक नियम आहे ज्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला सनरायझर्स हैदराबादवर मोठा फायदा झाला आहे. या नियमाचा वापर करण्याची स्थिती निर्माण झाली तर सर्वांत मोठा फायदा केकेआरला होणार आहे. नक्की कोणता आहे हा नियम जाणून घेऊया सविस्तर..
हेही वाचा: RCB vs RR Weather Update: पावसामुळे रद्द झाला एलिमिनेटर सामना तर कोणत्या संघाला होईल फायदा? राखीव दिवस नसल्यामुळे या संघाला होणार नुकसान, सामना न खेळता होईल बाहेर.!
SRH vs KKR: आयपीएल प्लेऑफचा अनोखा नियम, सनरायजर्स हैद्राबादवर पडणार भारी? सामना न घेळता होतील बाहेर?
आयपीएलच्या नियमांनुसार सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs SRH) यांच्यातील सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जर सुपर ओव्हर टाय झाली आणि निर्धारित वेळेत संपली नाही, तर गुणतालिकेत अव्वल असणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. म्हणजे KKR आणि SRH यांच्यातील सामन्यात असे घडले तर शाहरुखचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. हे होणे सहसा शक्य नसले तरीही आयपीएलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही.
SRH vs KKR: प्रत्येक प्ले ऑफ सामन्यासाठी एक राखीव दिवस.
पावसामुळे आयपीएलचे काही महत्त्वाचे सामने विस्कळीत झाले आहेत. गुजरातचा दुसरा आणि राजस्थानचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. प्लेऑफच्या सामन्यांमध्येही असे घडले तर चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. आयपीएल प्लेऑफच्या सर्व सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तथापि, राखीव दिवसापूर्वी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देखील आहे. त्याच दिवशी खेळ संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरच सामना राखीव दिवशी जाईल.
आता राखीव दिवसही पावसामुळे वाहून गेला, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. म्हणजे, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबी आणि पराभूत संघ यांच्यात सामना झाला आणि सामन्याचा दिवस आणि राखीव दिवस पावसामुळे वाहून गेला, तर डु प्लेसिसचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. पण, चांगली गोष्ट म्हणजे प्लेऑफच्या सामन्यांना पावसाचा धोका नाही.
अहमदाबाद असो की चेन्नई, संपूर्ण सामना वेळेवर सुरू होणे आणि संपणे अपेक्षित आहे. त्यामुळे आयपीएल 2024 चे प्ले ऑफचे सर्व सामने प्रेक्षकांना बिना अडथला पाहता येणार आहेत. आता यावर्षी कोणता संघ ट्रॉफी जिंकतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.