SRH vs LSG: दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना ,आज जो जिंकेल तो प्ले ऑफकडे…” महत्वाच्या सामन्यात संघात होणार मोठे बदल, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

0
2
SRH vs LSG: दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना ,आज जो जिंकेल तो प्ले ऑफकडे...

SRH vs LSG Preview:    IPL 2024 च्या 57 व्या सामन्यात बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी (SRH vs LSG) होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. एसआरएच आणि एलएसजीला त्यांच्या मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासह पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. 17 व्या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 11-11 सामने खेळले असून 6-6 असा विजय मिळवला आहे. अशा स्थितीत आजचा सामना जिंकणारा संघ प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल.

SRH vs LSG Preview:  मयंक अगरवाल प्लेइंग 11 मधून बाहेर असू शकतो.

SRH vs LSG: दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना ,आज जो जिंकेल तो प्ले ऑफकडे..." महत्वाच्या सामन्यात संघात होणार मोठे बदल, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

सनरायझर्स हैदराबादने गेल्या सामन्यात मयंक अग्रवालला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले होते. मात्र, मयंक अग्रवाल केवळ 5 धावा करू शकला. अशा स्थितीत त्याला बाकावर बसावे लागू शकते. त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते. लखनौ आजच्या सामन्यातही काही बदल करू शकतो. ॲश्टन टर्नरच्या जागी क्विंटन डी कॉकला संधी मिळू शकते. याशिवाय अर्शीन कुलकर्णीच्या जागी कृष्णप्पा गौतमचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला जाऊ शकतो. गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त मोहसीन खानची जागा युधवीर सिंग घेऊ शकतो.

SRH vs LSG: असी असू शकते दोन्ही संघांची प्लेईंग 11 ( SRH vs LSG Probable Playing 11)

सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग 11 (Sunrisers Hyderabad Playing 11)

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर: : मयंक मार्कंडेय/जयदेव उनाडकट’

लखनौ सुपर जायंट्स प्लेईंग 11 ( Lucknow Super Giants Playing 11)

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, युद्धवीर सिंग, यश ठाकूर.
इम्पॅक्ट प्लेयर: कृष्णप्पा गौतम
SRH vs LSG: दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना ,आज जो जिंकेल तो प्ले ऑफकडे..." महत्वाच्या सामन्यात संघात होणार मोठे बदल, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

SRH vs LSG  आजपर्यंतचे सामने (SRH vs LSG Head to Head Record)

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास, लखनौ सुपर जायंट्सचा पगडा भारी आहे. SRH आणि LSG यांच्यात आतापर्यंत 3 वेळा सामना झाला असून लखनौने सर्व सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना 1 आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सामना जिंकला आहे. SRH ने त्यांच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 55 सामने खेळले आहेत आणि 34 जिंकले आहेत. 21 मध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौने हैदराबादच्या मैदानावर 1 सामना खेळला आणि त्यावर कब्जाही केला. आजचा हा सामना जिंकणारा संघ प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलेल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here