IPL 2024 SRH vs LSG: IPL 2024 मधील 57 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG)यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या सलामीच्या जोडीने अवघ्या 9.4 षटकांत हा सामना जिंकला होता. हैदराबादचा या मोसमातील हा सातवा तर लखनौचा सहावा पराभव आहे. या विजयासह सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि फ्रँचायझी मालक संजीव गोयंका बोलताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून संजीवला टीमचा कर्णधार राहुलवर राग आल्याचे दिसते. ज्यावर चाहते खूपच निराश दिसत आहेत.
संजीव गोयंका यांच्यावर चाहते संतापले
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 165 धावा केल्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या सलामीच्या जोडीने लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. हैदराबादने अवघ्या 9.4 षटकांत हा सामना जिंकला. हैदराबादकडून फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने 89 आणि अभिषेक शर्माने 75 धावा केल्या. नंतर, फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका देखील त्यांच्या संघाची अशी कामगिरी पाहून खूपच निराश दिसले.
प्रत्यक्षात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया पाहून ते केएल राहुलवर ओरडत असल्याचा भास होतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता चाहते संजीव गोयंका यांच्यावर संतापले आहेत. X वर व्हिडिओ शेअर केल्यानंतर एका यूजरने लिहिले की,
लखनऊच्या मालकाकडून झालेले हे कृत्य हे अत्यंत दयनीय आहे. ज्याला क्रिकेटबद्दल A,B,C,D माहित नाही तो भारतीय फलंदाजाशी असे कसे बोलतो? इतकेच पैसे देऊन त्याने ते विकत घेतले म्हणून, काय मूर्खपणा आहे. KL ने अशा फ्रँचायझीमधून बाहेर पडले पाहिजे..
पहा व्हायरल व्हिडीओ,
यह @LucknowIPL मालिक की ओर से बहुत ही दयनीय है ।
जिनको क्रिकेट के बारे में A,B,C,D नही पता है वो एक भारतीय बल्लेबाज़ से इस तरह कैसे बात कर रहा है
वो सिर्फ़ इस लिए क्योंकि इतने पैसे देकर खरीदा है क्या बकवास है।
#klrahul को ऐसे फ्रेंचाइजी को लात मार के निकल लेना चाहिए ।… pic.twitter.com/40WieBoGZs
— Vipin Patel (@ImVipinPa29) May 8, 2024
आणखी एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, कॅमेऱ्यांसमोरील या सार्वजनिक वादानंतर, मला खात्री आहे की केएल राहुल पुढच्या वर्षी एलएसजी सोडत आहे. आयपीएलमधील मोठ्या पैशांचा खेळ चांगला आहे आणि मालक म्हणून निराशा समजून घ्या, परंतु मालक म्हणून संजीव गोयंका यांच्याबद्दल बरेच काही सांगते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.