SRH vs MI: हैद्राबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची केली धुलाई, उभा केला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा स्कोर..!

SRH vs MI: हैद्राबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची केली धुलाई, उभा केला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा स्कोर..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

SRH vs MI, Highest Score In the IPL HISTORY : आज IPL 2024 च्या 8 व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या एसआरएचने एमआयच्या गोलंदाजांचा चांगलाच मारा केला.

हैदराबादने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. आयपीएलच्या एका डावात केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यासह हैदराबादने आरसीबीचा 11 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. मुंबईला या मोसमातील पहिला विजय मिळवायचा असेल तर त्यांना २७८ धावा कराव्या लागतील.

हैद्राबादने उभारली आयपीएलमधील सर्वोच्च डावातील धावसंख्या

यापूर्वी आयपीएलमधील एका डावात सर्वाधिक धावा २६३ धावा होत्या. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुणे वॉरियर्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. गेल्या मोसमात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरुद्ध २५७ धावा केल्या होत्या. तर IPL 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात लायन्सविरुद्ध 248 धावा केल्या होत्या. 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 246 धावा केल्या होत्या.

आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या (Highest Score In the IPL HISTORY)

  • 277/3 – SRH vs MI, हैदराबाद, 2024

  • 263/5 – RCB वि PWI, बेंगळुरू, 2013

  • २५७/५ – एलएसजी वि पीबीकेएस, मोहाली, २०२३

  • 248/3 – RCB वि GL, बेंगळुरू, 2016

  • २४६/५ – सीएसके वि आरआर, चेन्नई, २०१०

प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेडने येताच चौकारांचा पाऊस पाडला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. हार्दिक पांड्याने ही भागीदारी ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोडली. त्याने मयंक अग्रवालला टीम डेव्हिडकरवी झेलबाद केले. मयंकने 13 चेंडूत 11 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकारही मारला.

अभिषेक शर्माने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले.

ट्रॅव्हिस हेडने अभिषेक शर्मासह डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. 8व्या षटकात जेराल्ड कोएत्झीने हेडची विकेट घेतली. हेडने 24 चेंडूत 62 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून 9 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. पियुष चावलाने 11व्या षटकात अभिषेकची शिकार केली. त्याने 23 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या.

Untitled 3

SRH साठी सर्वात वेगवान IPL अर्धशतक (बॉल).

१६ – अभिषेक शर्मा वि एमआय, हैदराबाद, २०२४

  • १८ – ट्रॅव्हिस हेड वि एमआय, हैदराबाद, २०२४

  • 20 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध CSK, हैदराबाद, 2015

  • 20 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर, हैदराबाद, 2017

  • २० – मोइसेस हेन्रिक्स विरुद्ध आरसीबी, हैदराबाद, २०१५

  • 21 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, 2016

एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची नाबाद भागीदारी केली. मार्कराम २८ चेंडूत ४२ धावा करून नाबाद राहिला आणि क्लासेन ३४ चेंडूत ८० धावा करून नाबाद राहिला. मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांना 1-1 यश मिळाले.

मुंबई इंडियन्सपुढे विजयसाठी 278 धावांचे विशाल लक्ष आहे. मुंबईचे फलंदाज हे आव्हान पेलवू शकतात का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.


====आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *