SRH Vs RCB: चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम वर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या सामन्यात अक्षरशः चौकार-षटकारांचा पाऊस पडला. हैदराबादने कालच्या सामन्यांमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केले आहे. ट्रॅव्हस हेडच्या शतकी खेळाच्या जोरावर हैदराबाद एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरला. हेडला इतर खेळाडूंनी देखील भरघोस अशी साथ दिली.
सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. हेड बाद झाल्यानंतर क्लासेन याने देखील मोर्चा संभाळत 67 धावांची आक्रमक खेळी केली. शेवटच्या षटकात ऍडम मार्क्रम व अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. त्यामुळे हैदराबादचा संघ एक मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला. हैदराबादने कालच्या सामन्यात कोणते विक्रम केले चला तर जाणून घेऊया.
हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला. पॅट कमिन्स च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाने आयपीएल मध्ये पुन्हा एकदा यंदाच्या हंगामात सर्वात मोठी धावसंख्या उभी केलिए. यापूर्वी हंगामाच्या सुरुवातीला हैदराबादने मुंबई विरुद्ध 277 धावा केल्या होत्या. कालच्या सामन्यात आरसीबीचा 263 धावांचा विक्रम देखील त्यांनी मोडीत काढला. हैदराबादने तीन बाद 287 इतक्या डोंगर एवढ्या धावा काढल्या.
हैदराबादने एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम देखील मोडीत काढला. हा विक्रम यापूर्वी आरसीबीच्या नावावर होता. बंगळूरने 2013 मध्ये एका डावात 21 षटकार मारले होते. आता हैदराबादने कालच्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 22 षटकार ठोकून हा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे आरसीबीचा हा विक्रम त्यांच्याच विरोधात खेळताना हैदराबादने मोडीत काढला आहे.
हैदराबादचा सनरायझर्स हैदराबादचा संघ कोणत्याही कोणत्याही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी टीम बनली आहे. यापूर्वी नेपालच्या टीमने मंगोलिया विरुद्ध खेळताना तीन बाद 314 धावा करण्याचा विक्रम केला होता. हैदराबाद सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाचे यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादने आरसीबी विरुद्ध खेळताना तीन बाद 287 धावा केल्या होत्या.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.