श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेने बांगलादेशवर धडाकेबाज विजय मिळवला आहे तर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंका मजबूत स्थितीत आहे. चितगावच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिला डावात 531 धावांचा डोंगर रचला आहे. यासह श्रीलंकेने भारताचा 48 वर्ष पूर्वीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.
श्रीलंकेच्या संघाकडून कोणत्याही खेळाडूला शतक ठोकता आले नसले तरी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला. एकही शतक न करता एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. भारतीय क्रिकेट संघाने 1976 साली न्यूझीलंड विरुद्ध कानपूर कसोटी मध्ये खेळताना 9 बाद 524 धावा केल्या होत्या. ज्यात एकाही शतकाचा समावेश नव्हता.
श्रीलंका संघाने हाच विक्रम मोडून काढला. कसोटी क्रिकेटमध्ये शतक न ठोकता सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम श्रीलंकेने केला. पहिल्या दिवशी श्रीलंकेने 4 बाद 334 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी या संघाने 159 षटकात सर्वबाद 531 धावा केल्या. श्रीलंका संघातील सहा खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केली तर दोन खेळाडूंचे शतक हुकले कुशल मेंडीस यांने 93 धावा तर कामींदू मेंडीस हा 92 धावांवर नाबाद राहिला. संघ सर्वबाद झाल्याने तो शतक पूर्ण करू शकला नाही.
चटगाव कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशचा संघ 2 बाद 55 धावांवर खेळत होता. तयैजुल च्या रूपात बांगलादेशने पहिला विकेट गमावली. तो आपले खाते देखील उघडू शकला नाही. मोहम्मद हसन जॉय हा 31 धावा काढून कुमाराच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. बांगलादेशचा संघ अजूनही 476 धावांनी मागे आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये शतक न करता एका डावात सर्वाधिक धावा करणारे संघ
-
५३१ धावा – बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंका (वर्ष २०२४)
-
५२४ धावा, ९ विकेट्स, डाव घोषित – न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारत (वर्ष १९७६)
-
५२० धावा, ७ विकेट, डाव घोषित – वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (वर्ष २००९)
-
५१७ धावा – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका (वर्ष १९९८)
-
8 विकेट्सवर 500 धावा, डाव घोषित – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान (वर्ष 1981)
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.