ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
SRILANKA TEAM NEW COACH: गेल्या काही दिवसांपासून निराशाजनक कामगिरी करणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघाने वेस्टइंडीज अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. श्रीलंका क्रिकेट संघाने शनिवारी पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज आकिब जावेद यांना संघाच्या राष्ट्रीय गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे. अकिब जावेद आता श्रीलंकेच्या गोलंदाजांना जून मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत मार्गदर्शन करतील. त्यांचा हा कालावधी खूप कमी आहे.
51 वर्षीय अकिब यांच्या नियुक्तीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ डिसल्वा यांनी संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल, अशी अशा व्यक्ती केली आहे. अकिब यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा आणि प्रशिक्षणाचा प्रचंड दांडगा अनुभव आहे. याचा फायदा श्रीलंका क्रिकेट संघाला निश्चितच होईल.
अकिब यांनी यापूर्वी यूएईच्या राष्ट्रीय संघाला त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या संघाने एक दिवसीय आणि टी-ट्वेंटी चा दर्जा प्राप्त केला होता. यासोबतच ते पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ज्युनिअर आणि सीनियर तसेच अफगाणिस्तानच्या संघाला देखील मार्गदर्शन केले होते. पीसीएलमध्ये ते लाहोर कलंदर्स सोबत ही जोडले गेले आहेत. 2004 मध्ये पाकिस्तानने 19 वर्षाखालील विश्वचषक आणि 2009 मध्ये राष्ट्रीय संघाने टी-20 विश्वचषक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिंकला होता.
1988 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी अकिब जावेद यांची पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली होती. 1992 मध्ये पाकिस्तानने वनडे विश्वचषक जिंकला होता त्यावेळी ते संघाचे प्रमुख खेळाडू होते. अकिब यांनी पाकिस्तानकडून खेळताना 22 कसोटी सामन्यांमध्ये 54 विकेट घेतले होते. तर 163 सामन्यात 184 विकेट बाद करण्यात त्यांना यश मिळाले.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.