‘आम्ही भारताला भारतात जाऊन हरवू शकतो..’ दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे भारतीय संघाला पराभूत करण्याबाबत मोठे वक्तव्य..
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानावर पार पडणार आहे. गेल्या १६ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघाला भारतात केवळ १ कसोटी सामना जिंकता आला आहे. त्या विजयात ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाची भूमिका बजवणारे गोलंदाज स्टीव्ह ओकिफने भारतीय संघाला पराभूत करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
माजी क्रिकेटपटू स्टीव्ह ओफिकने द एजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत असलेल्या पॅट कमिन्सकडे २०१७ पेक्षा अधिक चांगला आणि मजबूत संघ आहे. यावेळी हा संघ भारतीय संघाला नक्कीच हरवू शकतो. ” ऑस्ट्रेलिया संघाने १९६९ पासून भारतात केवळ २ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तसेच तो पुढे म्हणाला की, “मी खूप उत्साहित आहे, २०१७ मध्ये संघाचा भाग असलेल्या संघातील बरेच खेळाडू या संघात आहेत.ते यातून खूप काही शिकले असतील. आम्ही अनेकदा विजयाच्या जवळ आलो आहोत, मला विश्वास आहे की यावेळी आम्ही जिंकू.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आमची फलंदाजी मजबूत आहे. जे फिरकी गोलंदाजांना सहजरित्या खेळू शकतात. जरी मार्नस लॅबुशेन भारतीय खेळपट्टीवर खेळला नसला तरी तो फिरकीविरुद्ध सहजरित्या फलंदाजी करू शकतो. कॅमेरॉन ग्रीन हा एलिट खेळाडू आहे त्यामुळे मला वाटते की आमचा संघ देखील मजबूत संघ आहे.”
हे ही वाचा..