अहो आच्छर्यम..! या ज्वालामुखीतून लाल नाही तर निळ्या रंगाचा लाव्हारस बाहेर पडतोय…

अहो आच्छर्यम..! या ज्वालामुखीतून लाल नाही तर निळ्या रंगाचा लाव्हारस बाहेर पडतोय...

जेंव्हा पण आपण ज्वालामुखीच्या विस्फोटाबद्दल ऐकतो तेंव्हा आपल्या सर्वांच्या मनात धडकीच बसते आणि डोळ्यासमोर येते त्या ज्वालामुखीचे भयंकर रौद्र रूप आणि त्यामधून बाहेर पडणारा केशरी , लाल ,पिवळ्या रंगाचा लावारस.

परंतु आज आपण जाणून घेणार आहोत एका विशिष्ठ ज्वालामुखीबद्दल ज्याच्या उद्रेकातून लाल, पिवळा, आणि केशरी नाही तर चक्क निळ्या रंगाचा लावारस बाहेर पडतो. हो हि आश्चर्य चकित करणारी गोष्ठ आहे परंतु पूर्णतः खरी आहे. चला तर बघूया कुठे आणि कसा आहे हा ज्वालामुखी आजच्या या खास लेखातून……

पाल्मा आइलैंड पर भूकंप के 22 हजार झटके; फटा ज्वालामुखी, देखें तबाही की तस्वीरें - volcano eruption on la palma destroys homes no injuries

गेल्या काही वर्षांमध्ये ज्वालामुखीचे निरीक्षण, अभ्यास, आणि त्यांचे वैशिष्ट्य शोधून काढण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जगभरात संभाव्यतः १५०० सक्रीय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी ५०० ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. आजच्या वेळी ४० पेक्षा जास्त ज्वालामुखींचा उद्रेक होत आहे. जेव्हा आपण ज्वालामुखी फुटत असल्याचा विचार करता तेव्हा मनात येणारे रंग वितळलेल्या केशरी-लाल-पिवळ्या मिश्रणाचे असतात.परंतु आपण निळ्या रंगाच्या लवाची कल्पना पण करू शकत नाही.

विचित्र ज्वालामुखी मधून या कारणामुळे निघतोय निळा लाव्हा.

हा विचित्र असा ज्वालामुखी इंडोनेशिया येथे स्थित आहे. सक्रीय ज्वालामुखींनी अधिराज्य केलेल्या इंडोनेशिया या देशात निळ्या रंगाच्या लावेचे अत्यंत आकर्षक असे ज्वालामुखी आहेत. बहुतेक ज्वालामुखी हे जावा बेटावर आढळतात जावा हे बेत ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे बनलेले जगातील १३ व्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.

हा ज्वालामुखी संपूर्ण जगामध्ये (Kawah ljen) या नावाने प्रसिध्द आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर प्रत्येकवेळी यामधून निळ्या रंगाचा लावा बाहेर पडतो. या लाव्ह्याकडे जेंव्हा आपण बघतो तेंव्हा आपल्याला असे वाटते जणू काही पर्वतावरून निळ्या रंगाचा प्रकाश वाहत आहे.

अहो आच्छर्यम..! या ज्वालामुखीतून लाल नाही तर निळ्या रंगाचा लाव्हारस बाहेर पडतोय...

Olivier Grunewald नावाचे एक फोटोग्राफर आहेत ते गेली कित्तेक वर्षांपासून या ज्वालामुखीचे फोटो काढून त्यावर शोध करत आहेत. ज्वालामुखीचा लावा निळा असणे हि एक असामान्य गोष्ट आहे, त्यांच्या मते सल्फुरिक गॅसच्या जळण्यामुळे या लाव्यातून तो निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो.

याचा अर्थ तो लावारस निळा नसून त्यामधून बाहेर पडणारा प्रकाश हा निळा आहे. Olivier Grunewald यांच्या नुसार जेंव्हा या ज्वालामुखीमधून लावा बाहेर पडतो तेंव्हा त्यातून उत्सर्जित होणारी सल्फुरिक गॅस हि बाहेरील ऑक्सिजनच्या संपर्कात येवून निळा प्रकाश पडतो. हे सर्व सक्रीय(solfatara) एक नैसार्गीक ज्वालामुखीय स्टीम व्हेंट च्या उपस्थितीमुळे होते. Olivier Grunewald यांनी जे फोटो काढले आहेत त्या फोटोंमध्ये कोणत्याही प्रकारच्या फिल्टरचा वापर केला नाहीये.

काही वायू द्रव सल्फरमध्ये घनरूप होतात आणि ते ढलप्याने जळत राहतात आणि खाली वाहतात, ज्यामुळे निळ्या लावा दिसतात. दिवसभर ज्योत जळते, परंतु निळा रंग रात्रीच्या वेळी दिसून येतो. म्हणूनच अनेक पर्यटक हे रात्रीच्या वेळीच हे अद्भुत दृश्य बघण्यासाठी येतात.La Palma volcano: Fresh lockdowns amid record-breaking 85 days of activity | Euronews

जेंव्हा पण कोणी या ठिकाणी भेट देण्यास जातात तर त्यांना गॅस मास्क आणि डोळ्यांना संरक्षण देणारा चास्म सोबत घेऊन जावे लागते कारण; ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे रासायनिक वायू हे मानवास श्वास घेण्यास त्रास देतात.

 

या ज्वालामुखीच्या लावामुळे याठिकाणी एक मोठा असिडीक तलाव बनला आहे. जो जगातील सर्वात मोठा असिडीक तलाव आहे. या तलावामध्ये हाइड्रोक्लोरिक एसिडची मात्रता खूप अधिक आहे. त्यामुळेच हिरव्या आणि निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होतो, हे सर्व वितळलेल्या धातूंमुळे होते


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *