Jatinga Vally: वाचून विश्वास बसणार नाय पण खरंय..! येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणहून येऊन हजारो पक्षी आत्महत्या करतात..

Jatinga Vally: वाचून आच्छर्य वाटेल पण खरंय..! येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणहून येऊन हजारो पक्षी आत्महत्या करतात..

 

Story of brids death point jatinga vally: दरवर्षी आपल्या देशात अनेक लोक आत्महत्या करतात त्यामध्ये शेतकरी वर्गातील संख्या सर्वाधिक आहे .परंतु जर तुम्हाला म्हटले की, पक्षी देखील आत्महत्या करतात तर आपणास हे  खोटे वाटेल.परंतु ही गोष्ट एकदम सत्य आहे , आजच्या जगात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्याचा शोध घेणे हे विसाव्या शतकातील विज्ञानिकांना पण शक्य नाही. त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील “जतींगा दरी”.चला तर जाणून घेऊयाया दरीमधील असे कोनते  रहस्य आहे जे आजूनही लोकांना सोडवता आलेलं नाहीये.

 आसाम :- नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले आसाम राज्य हे पर्यटकांमध्ये आवडते स्थळ मानले जाते. या राज्याच्या दऱ्या–खोऱ्यांमध्ये  मागील काही वर्षात अनेक जनजातीचे लोक येऊन बसले आहेत. त्यामुळे येथील संस्कृतीत आणखीनच भर पडली आहे. मोठी आणी घनदाट जंगले , सगळीकडे पसरलेले चहाचे मळे, अतिशय स्वच्छ भ्रम्हपुत्र नदी हे मनोरम्य दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. आसाम हे राज्य त्याची शांतता, सुंदरता आणी संस्कृती यामुळे ओळखले जाते. इथले पर्यटन जितके अप्रतिम सुंदर आहे तितकेच रहस्यमयी आणी आश्चर्यकारकपण आहे. आसाम मध्ये एक असेही स्थान आहे जेथे चक्क पक्षी आत्महत्या करतात ,हे स्थान आहे दिमा हसावो जिल्ह्यातील जतींगा दरी (jatinga vally ).

वाचून आच्छर्य वाटेल पण खरंय..! येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणहून येऊन हजारो पक्षी आत्महत्या करतात..

 जतींगा मध्ये १०० वर्षापासून दरवर्षी हजारो पक्षांचा विचित्रपने मृत्यू होतो. म्हणूनच ही दरी पक्षांच्या मृत्यूची दरी म्हणून ओळखली जाते.

येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणहून पक्षी येतात आणि आत्महत्या करतात. ह्या घटनेच्या मागचे खरे कारण आजपर्यंत कुणालाही समजलेले  नाही. परंतु आता अनेक पक्षी शास्त्रज्ञांचे लक्ष याकडे आकर्षित झाले आहे. ही घटना सर्वाधिक सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जास्त प्रमाणात घडते, या गोष्टीचे अनेक करणे लोकांनी काढले आहेत परंतु ठोस कारण कोणीच शोधू शकले नाही. ही घटना सायं ७ ते रात्री १० या वेळेत जास्त प्रमाणात होते. नक्की काय आहे या घटनेचं रहस्य.

 

jatinga vally आत्महत्येचे गूढ रहस्य :

पक्षांच्या आत्महत्ये मागचे अनेक शास्त्रज्ञांनी तर्क वितर्क मांडले आहेत पण खरे कारण कोणालाही माहित नाही अशा परिस्थितीमध्ये काही स्थानिक लोकांच्या मते,येथील वेगवान हवेत पक्षाचे संतुलन बिघडते आणि ते पक्षी आजूबाजूच्या झाडांवर धडकून मरतात .तसेच काहींच्या मते येथे धुके,ढग,असतो यामुळे पक्षांना काही न दिसल्यामुळे ते मरतात. काही गावकर्यांच्या मते तर, आकाशात उडणारी भुते या पक्षांना खाली पाडून मरतात.

परंतु विज्ञानाच्या काळात अशा अंधश्रधांवरविश्वास ठेवता येत नाही. म्हणूनच अनेक पक्षी शास्त्रज्ञांनी या घटनेसाठी आपला वेळ समर्पित केला आहे.त्यांना असे आढळून आले कि, किंगफिशर , पौंड हेरॉन , बलक बितरण, टायगर बितरण इत्यादी स्थानिक पक्षांच्या प्रजातीही या विचित्र घटनेच्या शिकार होत आहेत.

अभ्यासातून असेही समोर आले आहे की, पावसाळ्यात आसाम मधील पानवठ्या  त्या काळात भरून जातात त्यामुळे त्या पक्षांचे घरटे उद्वस्त झाल्यामुळे ते स्थलांतर करण्यास मजबूर होतात. जतींगा हे स्थान त्यांच्या मार्गावर येत असल्यामुळे हे ही एक कारण असावे. आश्चर्याची बाब म्हणजे सन १९८८ मध्ये जेंव्हा आसाम मध्ये महापूर आला होता तेंव्हा पक्षांच्या आत्महत्या सर्वात जास्त झाल्या होत्या. हे पक्षी जेंव्हा स्थलांतरित होतात तेंव्हा त्यांच्या मार्गात धुके,ढग,आणि जोरदार वारे येते त्यामुळे हे पक्षी गावकर्यांनी केलेल्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि लोकांनी लावलेल्या सापल्यामध्ये अडकून जखमी होवून पडतात.हे पक्षी स्वादिष्ट असल्यामुळे या ठिकाणी आलेले अनेक पर्यटक आवडीने खातातही.

Jatinga Vally: वाचून आच्छर्य वाटेल पण खरंय..! येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणहून येऊन हजारो पक्षी आत्महत्या करतात..

या घटनेचे कारण उलगडण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले. या अभ्यासामध्ये ४४ प्रजातीचे पक्षी या प्रकाशाकडे आकर्षित झाले आहेत म्हणजे या गोष्टीचे एक कारण गावकर्यांनी लावलेल्या सापळ्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु यामधले एक सत्य म्हणजे लांब पल्ल्याचे स्थलांतरित पक्षी हे या प्रकाशाकडे आकर्षित होत नाहीत.त्यामुळे ही घटना आणखीच विचित्र वाटते.

जतींगा महोत्सव :

भारताचे प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली सुद्धा या घटनेणे चकित झाले होते त्यांनी असे सांगितले होते कि, “माझ्यासाठी विचित्र गोष्ठ ही आहे कि या पक्षांच्या प्रजाती त्यावेळी उडतात ज्यावेळी त्यांना गाढ झोपेत राहायला हवे स समस्येवर विभिन्न प्रकारे अध्ययन करणे जरुरीचे आहे “ .

स्थानिक प्रशाषण या पक्षांच्या आत्महत्येच्या वेळी एक कार्यक्रम आयोजित करते.या कार्यक्रमाला जतींगा महोत्सव असे  म्हटले जाते. हा कार्यक्रम प्रथम २०१० मध्ये आयोजित केला होता.या मुळे पर्यटक तर आकर्षित होतात पण या गोष्ठीमागाचे गूढ अद्यापही कोणालाच माहित होवू शकले नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *