उत्तराखंड मधील’ या’ तलावामध्ये 500 मानवी हडकांचे सांगाडे रहस्यमयरित्या सापडले होते..

उत्तराखंड मधील' या' तलावामध्ये 500 मानवी हडकांचे सांगाडे रहस्यमयरित्या सापडले होते..

 

 

उंचच उंच पर्वत रांगाचा हिलामय. याच हिमालयाच्या पर्वतरांगात उंचावर असलेला एक तलाव आजसुद्धा लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच कारणही तसंच आहे. हा तलाव चर्चेत आहे तो म्हणजे यात सापडलेल्या 500 पेक्षाही जास्त मानवी सांगाड्यामुळे..

 

उत्तराखंड मधील रुपकुंड तलावात 500 मानवी सांगाडे सापडले होते.

साहजिकच प्रश्न निर्माण झाले कि, एवढ्या मोठ्या उंच जागेवर एवढे सगळे सांगाडे एकाच वेळी आले तरी कसे? ज्यांची हे सांगाडे होते ते नेमके कोण होते? कुठून आले होते? आणि कुठं जात होते? महत्वाचं म्हणजे या सर्वांचा मृत्यू तलावाजवळच का झाला? या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधने अदयाप सुरु आहे. या सर्व सांगाड्यावर शोध सुरु केला असून लवकरच आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळतील.

500

उत्तराखंड येथील रुपकुंड तलावाबद्दल अनेक कथा आहेत. पण नेमके हे सर्व कश्यामुळे तिथे मेले यावर कोणालाच काही माहिती नहिये.थोड्याच दिवसापूर्वी झालेल्या रिसर्च मध्ये थोडाफार उलघडा झाला आहे.

 

रुपकुंड उत्तराखंड मधील “चमोली” मध्ये असलेला एक तलाव आहे जो 500 पेक्षा जास्त मानवी सांगाडे एकदाच सापडल्यामुळे प्रसिद्ध झाला आहे. निर्जळ असलेला हा तलाव हिमालयावर लगभग16489 फूट उंचावर आहे. त्यामुळे तिथे कित्येक दिवस कोणीही येत नसे.

 

सर्दीच्या दिवसात हा तलाव संपूर्ण बर्फाखाली झाकला जातो. नंतर जेव्हा उन्हाळा सुरु होतो. तस-तस बर्फ हळू हळू विरघळून तलावातील अनेक सांगाडे दिसायला लागतात. बर्फ जेव्हा संपूर्ण विरघळतो तेव्हा सर्व तलावामध्ये मानवी शरीराच्या हाड्य्या आणि सांगाड्याचा खच दिसून येतो.

 

या मानवी सांगाड्याचा शोध सर्वांत अगोदर 1942मध्ये लागला. तलावातील या सांगाड्याबद्दल नेहमी प्रश्न पडत असत, कि हे लोक नेमके होते तरी कोण? आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उंच ठिकाणी असलेल्या तलावाजवळ कश्यासाठी व कसे पोहचले? आणि पोहचल्यानंतर त्यांच्या सोबत असं नेमके काय झाले कि, या सर्वांना आपला जीव गमवावा लागला याबद्दल अनेक गोष्टी उत्तराखंड मध्ये प्रचलित आहेत. परुंतु योग्य अशी माहिती कोनालाही माहिती नव्हती. जणू हे सर्व एक रहस्य बनून आजपर्यंत चालत आले होते.

उत्तराखंड मधील' या' तलावामध्ये 500 मानवी हडकांचे सांगाडे रहस्यमयरित्या सापडले होते..

परंतु आता यावरून पडदा उठवलाय तो विज्ञानाने.. या मानवी सांगाड्यावर काही दिवसापूर्वीच अंतरराष्ट्रीय स्थरावर केल्या गेलेल्या संशोधनात असेल समोर आले कि, उत्तरराखंड मधील रुपकुंड तलावातील सापडलेले मानवी सांगाडे हे

भारत, ग्रीस आणि साऊथ अशिया मधून आलेल्या लोकांचे आहेत. संशोधनकर्त्यांच्या मताने हे सर्व सांगाडे एकदाच मेलेलं नसून हे अलग- अलग वेळी, अलग दिवशी मेले आहेत. महत्वाचं म्हणजे यात महिला आणि पुरुष दोघांचेही सांगाडे आहेत.

 

संशोधनात स्पष्ट केले आहे कि, भारतीय नागरिकांचे सांगाडे हे 7-10 व्या शतकातील असून हे सर्व अलग अलग वेळी अलग अलग घटनेत मेले आहेत. तसंच जे ग्रीस आणि आसपासच्या नागरिकांची जे सांगडे आहेत ते 17-20च्या शतकातील आहेत. जे अलग अलग वेळी तिथे पोहचले आहेत.

महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त संशोधन केलेल्या सांगाड्यातील अनेक सांगाडे ज्यांचे आहेत ते शारीरिक स्वास्थ उत्तम असणारे असावेत. थोडक्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास,रोग नव्हता. याचा अर्थ असाच आहे कि हे लोक हिमालयातील अचानक आलेल्या गारपीटमध्ये मृत्यू पावलेत. त्यांच्या खोपडीवरील केलेल्या संशोधनात त्याच्यावर मरण्याअगोदर गारा (बर्फवृष्टी ) चा मार बसला आहे.

अंदाजे हे बर्फाचे गोळे क्रिकेटमधील चेंडू एवढे मोठे असावेत, हिमालयात मोकळ्या जागेत त्यांना लपण्यासारखी एकही जागा न मिळाल्यामुळे त्यांचा बर्फ वृष्टीत सापडून मृत्यू झाला.

 

असं असलं तरी मात्र संशोधनकर्त्यांना हे समजू शकलेलं नाहीये कि, हे लोक नेमके जात कोठे होते? या मार्गांवर कुठलाही व्यापारिक मार्ग अथवा अन्य काहीही साधन नाही. परंतु असं म्हटलं जायचं कि रुपकुंड पासून नंदादेवी मंदिराकडे जाण्यासाठी एक छोटा रस्ता त्या वेळी असायचा.जिथे नंदादेवी तीर्थक्षेत्र उत्सव 12 वर्षातून एकदासाजरा होत असे.

तरीसुद्धा आजून हे स्पष्ट झाले नाहीये कि हे लोक रुपकुंड तलावाकडे का आले होते?

संपूर्ण पणे जरी हे रहस्य आजून उलगडलं नसले तरी रुपकुंड तलावत मात्र सापडलेल्या या सांगड्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *