Feature

IPL 2024: अचानक मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून काढल्यामुळे रोहित शर्माचे झालंय प्रचंड नुकसान, हे 7 विक्रम आता रोहित कधीही नावावर करू शकणार नाही..

IPL 2024:  आयपीएल 2024 च्या मिनी लिलावानंतर भारतीय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड होऊन दाखल झाला. फ्रेंचायजीने त्याला पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जाहीर केले. साहजिकच या निर्णयामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मोठ्या संखेने मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडीया अकाऊन्टला अनफॉलो केले सोबत हार्दिकला देखील मोठ्या प्रमाणत ट्रोल केले गेले.

मात्र आता निर्णय झाला आहे तर झाला आता काहीही करून रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार नाही, हे जवळपास संघाने स्पष्टकेले आहे, यामुळे सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माची लीडरशिप आता संपली आहे.रोहित शर्मा यापुढे मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसल्यामुळे आयपीएलमध्ये असे काही विक्रम आहेत जे तो या हंगामात कर्णधार म्हणून करू शकणार नाही. जाणून घेउया असे कोणते विक्रम होते जे रोहित या वर्षीही मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिला असता तर ते विक्रम आपल्या नावावर करू शकला असता.

IPL 2024: कर्णधारपद गेल्यामुळे हे मोठे विक्रम कधीही नावावर करू शकणार नाही रोहित शर्मा.

IPL 2024 TITLE SPONSER : टाटा आणि बिर्ला ग्रुपमध्ये मोठी टक्कर, वाचा शेवटी कुणाला मिळाले शीर्षक प्रायोजकचे अधिकार..!

1.कर्णधार म्हणून 4000 धावा.

आयपीएलमध्ये आतापर्यंत कर्णधार म्हणून खेळतांना रोहित शर्माने 158 सामन्यांमध्ये 3986 धावा केल्या आहेत.  या मोसमातही तो कर्णधार राहिला असता तर त्याने 4000 धावांचा विक्रम केला असता आणि असा विक्रम करणारा तो  तिसरा कर्णधार ठरला असता याआधी असी कामगिरी फक्त धोनी आणि विराट कोहली हे दोघेच करू शकले आहेत.

2. 100 खेळाडूंचे नेतृत्व करने.

आयपीएलमध्ये आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वात  93 खेळाडू खेळले आहेत.  जर तो या मोसमातही कर्णधार राहिला असता तर, कदाचित त्याने 100 खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा विक्रम केला असता आणि असा विक्रम करणारा तो तिसरा कर्णधार ठरला असता.  अशी कामगिरी याआधी  धोनी आणि विराटने केलेली आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या 4 कारणामुळे रोहित शर्माकडून काढून घेतले कर्णधारपद, हार्दिकवरील डाव हा ठरलेली प्लानिंग..

3. कर्णधाराच्या नेतृत्वात एका खेळाडूने 100 सामने खेळने

या मोसमातही रोहित कर्णधार राहिला असता तर, हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली 100 सामने खेळण्याचा विक्रम केला असता – आतापर्यंत हार्दिकने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 88 सामने खेळले आहेत. एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत फक्त 8 खेळाडूंनी 100 सामने खेळले आहेत.

4. कर्णधार म्हणून सर्वाधिक झेल.

या मोसमातही रोहित शर्मा कर्णधार राहिला असता तर कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षकाकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम तो आपल्या नावावर करू शकला असता. सध्या रोहितने कर्णधार म्हणून खेळतांना 56 झेल घेतले आहेत. या यादीत  विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 61 झेल आहेत. आता रोहित त्याला कधीही मागे सोडू शकत नाही.

5. सलग 11 वर्ष कर्णधारपद भूषवने

रोहित पहिल्यांदा 24 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला होता आणि कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा सामना 26 मे 2023 रोजी झाला होता, म्हणजेच तो एकूण 10 वर्षे आणि 33 दिवस कर्णधार राहिला. या मोसमातही तो कर्णधार राहिला असता तर त्याने कर्णधार म्हणून 11 वर्षे पूर्ण केली असती आणि कर्णधारपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला असता.आतापर्यंत, एमएस धोनी, विराट कोहली त्याच्यापेक्षा जास्त काळ कर्णधारपदाच्या यादीत होते. आणि दिनेश कार्तिक त्याच्या वर आहे.

IPL 2024: अचानक मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून काढल्यामुळे रोहित शर्माचे झालंय प्रचंड नुकसान, हे 7 विक्रम आता रोहित कधीही नावावर करू शकणार नाही..

6. सर्वाधिक चौकार मारणारा कर्णधार..

आत्तापर्यंत त्याने कर्णधार म्हणून 158 सामन्यात 530 चौकार मारले होते, जर तो या मोसमातही कर्णधार राहिला असता तर त्याला एमएस धोनीला (538) मागे सोडण्याची संधी मिळाली असती, मात्र आता धोनी अजूनही कर्णधार आहे, रोहित  शर्मा फक्त फलंदाज. या दोघांपेक्षा फक्त विराट कोहलीकडेच जास्त बाऊंड्री फटके आहेत.

7. सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार..

आत्तापर्यंत त्याने कर्णधार म्हणून 158 सामन्यात 158 षटकार ठोकले होते. जर तो या मोसमातही कर्णधार राहिला असता तर, त्याला विराट कोहलीला (169) मागे सोडण्याची संधी मिळाली असती कारण कोहली आता कर्णधार नाही.या यादीमध्ये सर्वांत जास्त षटकार जास्त षटकार धोनीने मारले आहेत.

तर मित्रांनो, हे होते ते काही विक्रम जे आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून खेळतांना रोहित शर्मा यावर्षी आपल्या नावावर करू शकला असता. मात्र आता मुंबई इंडियन्सने त्याला संघाच्या कर्णधार पदावरून हाकलून दिल्यामुळे हे विक्रम आपल्या नावावर करण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिलय.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button