शार्दुल ठाकूरने चक्क शाहरुख खान च्या पोरीला पाडली भुरळ! सामन्यानंतर सुहाना खान शार्दुल ठाकूर ला भेटून म्हणाली हे…

देशात गेल्या काही दिवसांपासून आयपीएल चा नवीन सिझन सुरू झाला आहे. या 16 व्या सिझन ची सुरूवात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या संघांच्या सामन्याने झाली. आपले देशातील सर्वाधिक लोकांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण आयपीएल आवडीने पाहतात.
आयपीएल मध्ये आपल्याला दररोज आक्रमक फलंदाजी केलेली दिसत आहे. काल झालेला कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना खूपच रोमांचक ठरला. काल झालेल्या सामन्यात कोलकत्ता संघाने आपल्या होम ग्राउंड वर 81 धावांचे अंतर ठेऊन मोठा विजय मिळवला आहे.
काल या सामन्यादरम्यान शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान सुद्धा मैदानावर उपस्थित होते. शाहरुख खान हा कोलकत्ता संघाचा मालक सुद्धा आहे.
नाणेफेक जिंकल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने गोलंदाजी करण्याचे ठरवले. केकेआरची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. सलामीवीर रहमन्नुल्ल्हा गुरबाझ याने अर्धशतक केले. पण त्यानंतर सलग तीन फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंग याने 46 धावा ठोकल्या.
परंतु सातव्या क्रमांकावर फलंदाजी साठी आलेल्या शार्दुल ठाकूर ने अतिशय आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 29 बॉल मध्ये 68 धावा केल्या. आणि संघाचा स्कोर हा 200+ नेला. या वेळी शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान ने शार्दुल ठाकूर ने मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा केले आहे.
सुहाना खान शार्दुल ला म्हंटले की मला क्रिकेट पाहण्याची जास्त आवड नव्हती. पण ही खेळी पाहिल्यानंतर मला वाटले, हे किती अप्रतिम आहे. मी अशी फलंदाजी याआधी पाहिली नव्हती. शार्दुल तू चांगला खेळलास. शार्दुल ठाकूर च्या आक्रमक फलंदाजी मुळे केकेआरने 20 षटकात 7 बाद 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचे फलंदाज 17.4 षटकात 123 धावा करून सर्वबाद झाले.