Viral Video: व्यंकटेश अय्यरने शतक झळकावताच शाहरुख खानच्या पोरीने स्टेडियममधून दिले असे रिएक्शन, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल…
Viral Video: व्यंकटेश अय्यरने शतक झळकावताच शाहरुख खानच्या पोरीने स्टेडियममधून दिले असे रिएक्शन, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल…
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar)ने काल केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या मंचावर खेळत होता. यादरम्यान तो कसा कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पण अर्जुनने त्याच्या पहिल्याच षटकात चांगली गोलंदाजी केली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याने आयपीएलचे पहिलेच षटक अत्यंत किफायतशीरपणे टाकले. अर्जुनने टाकलेले पहिले षटक उत्कृष्ट होते, त्याच्या पहिल्याच चेंडूमध्ये स्विंग पाहण्यास मिळाला होता.

या षटकात त्याने केवळ 4 धावा देत चाहत्यांची मने जिंकली पण, या सामन्यात आणखी एक घटना घडली जी केकेआरची मालकीण सुहान खान (Suhana Khan) हिच्याशी निगडीत आहे. सोशल मिडीयावरतिचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने (KKR) 185 धावा केल्या. यावेळी व्यंकटेश अय्यर (Vyanktesh Iyer) हा पहिल्या डावात चर्चेचा विषय ठरला. शानदार . त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
याआधी माजी किवी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमने (Brendan Macculam) झळकावले होते, ते कोलकाताकडून एकमेव शतक होते जे आयपीएलच्या पहिल्या सत्रात आले होते. म्हणजेच 15 वर्षांनंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने शतक झळकावले.
या शतकानंतर अय्यरने जबरदस्त सेलिब्रेशन केले आणि जेव्हा कॅमेरा वळला तेव्हा केकेआरचे मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खूप आनंदी दिसत होती. ती जोरजोरात ओरडून अय्यरला प्रोत्साहन देत होती. सुहाना खानची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तर सुहाना खान (Suhana Khan) ने अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा आनंद लुटला. ती अर्जुनला अनेकदा गोलंदाजी करताना पाहत होती.
पहा व्हिडीओ..
When Arjun Tendulkar bowled his first delivery for Mumbai Indians ❤️🙏 pic.twitter.com/JPPzQOchBD
— Vinesh Prabhu (@vlp1994) April 16, 2023
हेही वाचा: