‘मी आजपर्यंत असा निर्णय घेणारा पहिला नाही’ दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादवला संघातून बाहेर काढल्यावर भडकला हा माजी भारतीय खेळाडू, केले मोठे विधान..
‘मी आजपर्यंत असा निर्णय घेणारा पहिला नाही’ दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादवला संघातून बाहेर काढल्यावर भडकला हा माजी भारतीय खेळाडू, केले मोठे विधान..
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातून कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. कुलदीप यादवने पहिल्या कसोटी सामन्यात 40 धावा देत 8 विकेट घेतल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. या निर्णयामुळे चाहत्यांसोबतच क्रिकेटच्या दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मॅन ऑफ द मॅच असलेल्या खेळाडूला पुढील सामन्यात बाहेर बसवने हे अविश्वसनीय आहे – सुनील गावस्कर

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कुलदीप यादवला प्लेइंग 11 मधून वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्यात संताप व्यक्त करताना सुनील गावस्कर म्हणाले की, ‘मॅन ऑफ द मॅचला वगळणे अविश्वसनीय आहे.
सुनील गावसकर म्हणाले की अविश्वसनीय हा एकमेव शब्द मी वापरू शकतो आणि तो एक मऊ शब्द आहे. मला खूप कडक शब्द वापरायचे आहेत, पण तुम्ही सामनावीराला सोडले, ज्याने २० पैकी आठ विकेट्स घेतल्या आहेत, हे अविश्वसनीय आहे.
असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग-11
टीम इंडिया – केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज
बांगलादेश संघ – नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (क), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, तस्किन अहमद