विराट कोहलीच्या पन्नासाव्या शतकाबाबत सुनील गावस्कर यांनी केली मोठी भविष्यवाणी

 

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे भारताने सलग पाच सामने जिंकत दहा गुणांसह पॉइंट टेबल्स मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या परफॉर्मन्सने सर्वांनाच चकित करून सोडले आहे. याच दरम्यान माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहली विषय एक भविष्यवाणी केली आहे.

विराट कोहलीने 5 नोव्हेंबर रोजी ईडन्स गार्डन मैदानावर होणाऱ्या आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात त्याचे 50 वे शतक ठोकेल अशी भविष्यवाणी केली आहे. याच दिवशी विराट कोहली चा 35 वा वाढदिवस आहे.

आफ्रिके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचे दोन सामने होणार आहेत. 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध लखनऊच्या मैदानावर सामना होणार आहे तर दोन नोव्हेंबर रोजी श्रीलंका संघा विरुद्ध सामना होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघ सेमी फायनल मध्ये धडाकेबाज एन्ट्री करण्याच्या विचारात असेल.

सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स बोलताना म्हणाले की, विराट कोहलीचे 50 वे शतक पाच नोव्हेंबर दिवशी त्याच्या वाढदिवसा दिवशी होईल असे भाकीत केले आहे. त्यापूर्वी तो एक शतक इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या विरोध देखील ठोकू शकतो असे देखील त्यांनी भाकीत केले आहे.

या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने भल्याभल्या गोलंदाजाची बोलती बंद केली आहे. त्याने पाच सामन्यात चार वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच एक शतक देखील ठोकले आहे. किंग कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या मागील सामन्यात 95 धावांची देखील खेळे केले होते त्याचे शतक पाच धावांनी हुकले. त्याचे हे शतक झाले असते तर सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी झाली असती.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याने देखील विराट कोहलीच्या 50व्या शतका विषयी भविष्यवाणी केली होती. कोहली यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे 50 शतके पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला होता. विराटने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे 50 वे शतक पूर्ण केले तर सर्वात कमी सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.