भारतीय मुलीशी लग्न करून दिला तलाख, २०२० मध्ये पुन्हा केले डिझायनरशी लग्न कोलकाता च्या नरेन ची वेगळीच लव्ह स्टोरी
वेस्ट इंडिज या संघाचा सुनील नरेन हा खेळाडूचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. जो की हा खेळाडू बॉलिंग चांगल्या प्रकारे करतो. अगदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या लिस्टमध्ये सुनील नरेन चे नाव आगामी क्रमांकावर लागते. ज्यावेळी सुनील नरेन मैदानावर बॉलिंग साठी उतरतो त्यावेळी पुढील बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला घाम फुटतो. नरेन हा स्पिनर बॉलर आहे मात्र त्याची बॉलिंग टाकण्याची पद्धत एवढी वेगळी आहे की सरळ सरळ पुढचा खेळाडूंची विकेट निघते आशा या अस्सल अनुभवी खेळाडूची लव स्टोरी सुद्धा आहे जी आपण पाहणार आहोत.

२०२० मध्ये सुनील चा डिओर्स :-
वेस्ट इंडिज चा खेळाडू सुनील नरेन या खेळाडूने भारतीय मुलीशी लग्न केले जे की नरेन च अफेयर हे या मुलीशी चालू होतं आणि हे दोघे प्रेमात पडले. अगदी प्रेमात पडतात काही दिवसात त्यांनी दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा विचार देखील केला. मात्र लग्न झाल्यानंतर खूप दिवस हे नंतर टिकले नसल्याने दोघांनी डिओर्स घेतला. २०२० मध्ये सुनील नरेन ने डिझायनर अंजलीया सोबत दुसरे लग्न केले. कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये सुनील नरेन खेळतो. एवढेच नाही तर सुनील नरेन ची दुसरी पत्नी अंजलिया देखील सुनील व त्याच्या कोलकाता नाईट रायडर टीम ला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियम मध्ये येते. सुनील नरेन ची पत्नी डिझायनर असल्यामुळे ती तेवढीच स्टाईलीश सुद्धा आहे.
२०२० मध्ये केले अंजलीया सोबत लग्न :-
सुनील नरेन आपल्या जीवणाबद्धल जास्त चर्चा करत नाहीत. मात्र सुनील ने २०२० मध्ये अंजलीया सोबत लग्नगाठ बांधली. सुनील नरेन ने २०१३ साली भारतीय मूळ असणाऱ्या नंदिता या नावाच्या मुलीशी लग्न केले. मात्र नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याने काही दिवसात त्यांनी डिओर्स केला. या दोघांच्या नात्यातील दुरावा कसा निर्माण झाला ते अजूनही समजले नाही. मात्र नंदिता ला डिओर्स दिल्यानंतर सुनील नरेन ने अंजलीय सोबत लग्न केले.
अंजलिया हे एक प्रोफेशनल डिझायनर आहे. अंजलीया चे त्रिनिदाद मध्ये एक द फॅशन अटेलियर या नावाची मोठी कपड्याची लाईन देखील आहे. जे की अंजलीय स्टायलिश देखील आहे. नरेन आणि अंजलीया त्यावर्षी लग्न केले त्याच वर्षी ऑक्टोम्बर महिन्यात त्यांना मुलगा सुद्धा झाला. नरेन आणि अंजलीया या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ही माहिती सुद्धा दिली. अजूनही दोघे सोशल मीडियावर आपल्या मुलाचे फोटो पोस्ट करत असतात.