हे 5 सिनेमे न केल्यामुळे पूर्णपणे बरबाद झाला बॉबी देओल, नाहीतर आज बॉलिवूड चा किंग असता.

बॉलिवूड म्हटल की सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी. बॉलिवूड चे अभिनेते आणि अभिनेत्र्या सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेचा विषय बनत असतात. बॉलिवूड मध्ये अश्या अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांचे बॉलिवूड चे करियर संपले आहे.

तर चला मित्रांनो आज आपण या लेखात बॉबी देओल बॉलिवूड मधून कसा बाहेर पडला आणि कोणत्या कोणत्या चुका केल्या. त्यामुळे बॉबी देओल च्या बॉलिवूड करियर ला पूर्ण विराम लागला याची माहिती या लेखात देणार आहोत.
बॉबी देओल ने आपल्या बॉलिवूड करियर ला सुरुवात 1995 साली केली. बॉबी देओल चा पहिला सिनेमा हा बरसात हा होता. या चित्रपटासाठी बॉबी देओल ला फिल्म फेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला त्यानंतर बॉबी देओल ने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. या मध्ये सोईल्डर, बादल, बीच्छु, अपने, चोर माचाये शोर, अश्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले.
या लेखात आम्ही या चित्रपटांची नावे सांगणार आहे जी बॉबी देओल ने करण्यास नकार दिला होता नाहीतर बॉलिवूड चे आता किंग बॉबी देओल असते.
करण अर्जुन:-
बॉलिवूड मधील हा सुपरहिट सिनेमा आहे. सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान ला हा चित्रपट देण्याआधी बॉबी देओल आणि सनी देओल ला यामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती परंतु बॉबी देओल ने यामध्ये काम करण्याचा नकार दिल्यामुळे हा चित्रपट सलमान खान आणि शाहरुख खान ला मिळाला.
जब वी मेट:-
हा सुद्धा बॉलिवूड मधील सुपरहिट सिनेमा आहे. जब वी मेट सुरवातीला बॉबी देओल ला मिळाला होता परंतु काही कारणांनी बॉबी देओल या चित्रपटात काम करू शकले नाहीत त्यामुळे हा चित्रपट शाहिद कपूर ला देण्यात आला.
ये जवानी है दिवानी:-
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट झाला होता. तसेच या चित्रपटात आदित्य कपूर आणि दीपिका पादुकोण ने काम केले आहे. सुरुवातीला चित्रपटात काम करण्याची संधी बॉबी देओल ला मिळाली होती परंतु चित्रपटात काम करण्याला नकार दिल्यामुळे हा चित्रपट आदित्य कपूर ला देण्यात आला.
36 चायना टाऊन:-
36 चायना टाऊन या चित्रपटाची कथा ही बॉबी देओल साठी खास लिहिलं होती परंतु पुढे बॉबी देओल ने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा चित्रपट शाहिद कपूर ला मिळाला.
युवा:-
अभिषेक बच्चन, विवेक ओबरॉय आणि अजय देवगण यांच्याबरोबर युवा चित्रपटात काम करण्याची संधी बॉबी देओल ला सुद्धा मिळाली होती. परंतु या चित्रपटात काम न करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे बॉबी देओल च्या जागी अजय देवगण ला संधी मिळाली.