वानिंदू हसरांगाला रिप्लेसमेंट म्हणून शोएब मलिकच्या फॅनला मिळाली संधी, श्रीलंकेकडून खेळलाय एकमेव टी-२० सामना..

0
2
वानिंदू हसरांगाला रिप्लेसमेंट म्हणून शोएब मलिकच्या फॅनला मिळाली संधी, श्रीलंकेकडून खेळलाय एकमेव टी-२० सामना..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

सनरायझर्स हैदराबाद ने आयपीएल 2024 साठी दुखापतग्रस्त लेग स्पिनर वानिंदू हसरांगा याला पर्यायी खेळाडूची घोषणा केली आहे. श्रीलंकेचा 22 वर्षीय फिरकीपटू विजयकांत व्यासकांत याला हसरंगाचा रिप्लेसमेंट म्हणून हैदराबाद संघासोबत जोडले गेले आहे. 50 लाख रुपयाच्या बेस प्राईस मध्ये हैदराबाद ने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. 22 वर्षाच्या विजयकांत याने श्रीलंका संघाकडून एकमेव टी-20 सामना खेळला आहे. मागील वर्षी अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.वानिंदू हसरांगाला रिप्लेसमेंट म्हणून शोएब मलिकच्या फॅनला मिळाली संधी, श्रीलंकेकडून खेळलाय एकमेव टी-२० सामना..

विजयकांत व्यासकांत याने याने युएइ मध्ये झालेल्या आयएलटी ट्वेंटी टूर्नामेंट मध्ये एमआय अमीरत संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यात चार सामन्यात त्याला आठ विकेट घेण्यात यश मिळाले होते. तसेच बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये लंका प्रीमियर संघाकडून त्याने खेळले होते. हसरंग याला पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल 2024 मधून बाहेर पडला होता. बांगलादेश दौऱ्यावर त्यालाही दुखापत झाली होती.

हसरंगा याला सनरायझर्स हैदराबादने 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तो पहिल्यांदाच या संघाकडून खेळणार होता. मात्र डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएल 2022च्या लिलावामध्ये आरसीबी ने त्याला 10.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर सलग दोन हंगाम तो या संघाकडून खेळला आहे.

आरसीबी कडून पहिल्यांदा खेळताना त्याने दमदार कामगिरी केली होती. या हंगामात त्याने एकूण आरसीबी कडून खेळताना त्याने 26 विकेट घेतले होते. मात्र मागील वर्षात त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली होती. त्यामुळे आरसीबीने त्याला रिलीज करून टाकले.

वानिंदू हसरांगाला रिप्लेसमेंट म्हणून शोएब मलिकच्या फॅनला मिळाली संधी, श्रीलंकेकडून खेळलाय एकमेव टी-२० सामना..

22 वर्षाच्या विजयकांत याने मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंका संघाचा सदस्य होता. त्याने एक सामना खेळला होता. ज्यात चार षटकात 28 धावा देत एक गडी बाद केले होते. या युवा खेळाडूंनी आतापर्यंत 33 t20 सामने खेळले असून त्यात 6.76 च्या सरासरीने 72 विकेट घेतले आहेत. विशेष म्हणजे विजयकांत हा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याचा जबरदस्त फॅन आहे ते दोघेही जपणा किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतात.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here