क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरीही अनेक लोक क्रिकेट चे वेड आहेत. जगातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत हे आपल्याला माहीतच आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड सर्वानाच आहे.
आपल्या भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यापैकी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, जडेजा इत्यादी अनेक दिग्गज खेळाडू आपल्या भारतीय संघात आहेत.
सध्या आपल्या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंचा 6समावेश झाला आहे तसेच आक्रमक फलंदाजी करत असल्यामुळे हे युवा खेळाडू चांगलेच चर्चेत असतात यामध्ये सूर्या, के एल राहुल, पृथ्वी शॉ असे अनेक दिग्गज फलंदाज आहेत.
सर्वात जास्त क्रिकेट मद्ये येणारे तरुण खेळाडू हे धोनी ला आपले आयकॉन मानून येत असतात. तसेच आपले क्रिकेट चे देशासाठी खेळण्याचे स्वप्न साकार करत असतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जो सुरुवातीला फक्त महेंद्रसिंह धोनी साठी खेळायचा. परंतु नंतर देशासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर मित्रानो जाणून घेऊया कोण आहे हा खेळाडू.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना ने देशाला अनेक सामने जिंकून दिले आहे. सुरेश रैना ने 15 ऑगस्ट 2020 साली निवृत्ती ची घोषणा केली त्याच वेळी महेंद्रसिंह धोनी ने सुद्धा क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती.
सुरेश रैना ने मिडीयासमोर सांगितले की महेंद्रसिंह धोनी आणि मी एका छोट्याश्या गावातून आलो आहे तसेच आम्ही सोबत बरेच दिवस क्रिकेट सुद्धा खेळलो आहे. तसेच सुरेश रैना च्या आयुष्यात आणि करियर मद्ये धोनीचे खूप मोलाचे सहकार्य आहे असे सुद्धा सुरेश रैना ने सांगितले.
15 ऑगस्ट 2020 मध्ये महेंद्रसिंह धोनी ने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली त्याच दिवशी सुरेश रैना ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती ची घोषणा केली. आपल्या देशासाठी सुरेश रैना ने 226 एक दिवसीय सामने खेळले. या सामन्यात सुरेश रैना ने 5 शतके, 5610 धावा बनवल्या, तसेच 18 कसोटी सामन्यात सुरेश रैना ने 1 शतकासह 786 धावा बनवल्या. तसेच 78 T20 सामन्यात सुरेश रैना ने 1604 धावा काढल्या. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सुरेश रैना ने शतके झळकावली आहेत.