श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात surya kumar yadav आणि यजुवेंद्र चहल करू शकतात हे मोठे विक्रम,चहलला तर आहे मोठी सुवर्णसंधी, होऊ शकतो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज.
श्रीलंकासंघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तीन T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. दोन्ही संघांच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि श्रीलंका यांच्यात 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
ज्यामध्ये भारताने 17 आणि श्रीलंकेने 8 सामने जिंकले आहेत.त्यामुळे आजपर्यंतच्या कामगिरीनुसार सध्या तरी या मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड वाटतय. मात्र श्रीलंका संघाला कमी समजण्याची चूक भारतीय संघ करणार नाही ..
टीम इंडियासाठी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि भुवनेश्वर कुमार या मालिकेचा भाग नाहीत. या मालीकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार आणि सूर्यकुमार यादवला(SURYKUMAR YADAV )उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या सामन्यात काही विक्रम होऊ शकतात, ज्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे उपकर्णधार सुर्यकुमार यादव (surya kumar yadav) आणि यजुवेंद्र चहल (yuzvendra chahal) या पहिल्या सामन्यात मोठे विक्रम करू शकतात.
View this post on Instagram
सूर्यकुमार यादव (SURYKUMAR YADAV) ओलांडू शकतो 1500 धावांचा आकडा..!
जर सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 92 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1500 धावा करणारा तो भारताचा सातवा खेळाडू ठरेल. आतापर्यंत फक्त विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी हा आकडा गाठला आहे. 2021 मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने 42 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 1408 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताकडून सर्वाधिक विकेट्स
फिरकीपटू युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम 4 विकेट घेताच आपल्या नावावर करेल. सध्या हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे, ज्याने 87 सामन्यात 90 बळी घेतले आहेत. तर चहलने 71 सामन्यात 87 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय भूमीवर ५० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी युझवेंद्रला ५ विकेट्सची गरज आहे.

असे आहेत दोन्ही क्रिकेट संघ:
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षरदीप पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदेरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लंका, वानिंदू हसरंगा, अशेन बंदारा, महेश टीक्षाना, चमिका करुणारत्ने, कासुन भानुसाका, राजनाथ दुसना, मादक राजदुता, राजनाथ राजपूत, अशेन बंडारा, डी. वेल्स, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा