भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत २-० ची आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरू होणार आहे. हा सामना सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू विश्रांती करताना दिसून येत आहेत.
पत्नीसह तिरुपतीला लावली हजेरी..
भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टी -२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून मिळालेल्या विश्रांतीचा फायदा घेत त्याने तिरुपती दरबारी हजेरी लावली आहे. मंगळवारी त्याने आपल्या पत्नीसह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा लाभ घेता आला नाही. पदार्पणाच्या सामन्यात तो ८ धावांवर माघारी परतला होता.
View this post on Instagram
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.