गेल्या 22 मार्च पासून आयपीएल च्या 17 व्या सिझन ला सुरुवात झाली. यंदा च्या वर्षी सुद्धा अनेक संघात आपल्याला वेगवेगळे बदल झालेले दिसून आले त्याचबरोबर संघातील खेळाडूंची सुद्धा आदलाबदल झालेली दिसून आली आहे. काल राजीव गांधी स्टेडियम येथे झालेल्या आयपीएल च्या 2024 च्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाला पराभुताला सामोरे जावे लागले आहे. हैद्राबाद संघाने मुंबई इंडियन्स संघापुढे 277 धावांचे आव्हान ठेवले होते. आक्रमक फलंदाजी करत हैद्राबाद संघातील फलंदाजानी मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाजांना धूळ चारली.
मुंबई इंडियन्स च्या पराभूताचे मुख्य कारण काय?
काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइज हैद्राबाद या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला 31 धावांनी पराभूत मिळाला. यामध्ये कमी पडले ते म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाज. कारण सनराइज हैद्राबाद या संघातील फलंदाजानी मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली अवघ्या 10 षटकात हैद्राबाद संघाचा स्कोर 150 वर पोहोचला होता. दुसर कारण म्हणजे मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव MR.360 याला दुखापती मुळे संघातून बाहेर ठेवले गेले.
सूर्यकुमार यादव फिटनेस अपडेट:-
आयपीएल 2024 च्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्स संघाचे प्रदर्शन खराब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे फॅन्स मध्ये सूर्यकुमार यादव संघात कधी परतणार याची आतुरतेने वात पाहत आहेत. कारण सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघातील एक आक्रमक फलंदाज आहे. प्रत्येक येणाऱ्यां चेंडू वर तसेच मैदानाच्या चौहेर बाजूने शॉट खेळत फलंदाजी करू शकतो त्यामुळे त्याला MR.360 सुद्धा म्हणतात. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला सूर्यकुमार यादव ची गरज भासणार आहे. परंतु BCCI च्या सूत्रांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव ची स्थिती अजून नाजुक आहे त्यामुळे सूर्यकुमार यादव ला लगेच मैदानावर खेळता येणार नाही.
सूर्याच्या प्रकूर्ती मध्ये सुधारणा:-
हार्निया च्या ऑपरेशन मुळे सूर्यकुमार यादव ला मुंबई इंडियन्स संघातील काही सामने खेळता येणार नाहीत. परंतु BCCI च्या सूत्रांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव च्या प्रकृती मध्ये चांगली सुधारणा होत आहे शिवाय थोड्याच दिवसात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात खेळताना दिसेल. शिवाय सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आहे त्यामुळे BCCI चे सूर्याच्या आरोग्यावर विशेष लक्ष आहे.
BCCI ची मुख्य चिंता:-
सूत्राच्या मते बीसीसीआयची मुख्य चिंता ही आहे की सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक सामने खेळू शकेल की नाही. कारण 33 वर्षीय असेल सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सूर्यकुमार यादव ची तुलना दक्षिण आफ्रिकेचा निवृत्त फलंदाज एबी डिव्हिलियर या खेळाडू बरोबर केली जाते. सूर्यकुमार यादव ने T20 फॉरमॅटमध्ये 171.55 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने भारतासाठी 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके झळकावली असून 60 सामन्यात 2141 धावा पूर्ण केल्या आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.