तिसरा टी -२० सामना ‘सूर्या’साठी ठरू शकतो खास! विराट आणि ब्रँडन मॅक्क्यूलमला मागे सोडण्याची असेल संधी..
आपल्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी -२० सामन्यात आपल्या कारकीर्दीतील सर्वात संथ खेळी केली. त्याने अवघ्या ३१ चेंडूंमध्ये अवघा २६ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता. आता मालिकेतील अंतिम सामना खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव सज्ज झाला आहे. हा सामना सूर्यकुमार यादव साठी खास असणार आहे. कारण याच मैदानावर सूर्यकुमार यादवने पदार्पण केले होते. दरम्यान त्याला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी देखील असणार आहे.
मध्यक्रमात फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुध्द झालेल्या ७ टी -२० सामन्यांमध्ये २६० धावा केल्या आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दहाव्या स्थानी आहे. मात्र अंतिम सामन्यात जर त्याने मोठी खेळी केली, तर तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो.
विराट कोहली आणि ब्रँडन मॅक्क्यूलमला सोडू शकतो मागे..
क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये विराट कोहली आणि ब्रँडन मॅक्क्यूलमला मागे सोडण्याची संधी असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५११ धावांसह रोहित शर्मा सर्वोच्च स्थानी आहे. तर विराट कोहली ३११ आणि ब्रँडन मॅक्क्यूलम २६१ धावांसह आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत.

सूर्यकुमार यादवला ब्रँडन मॅक्क्यूलमला मागे सोडायचे असेल तर केवळ २ धावांची तर विराट कोहलीला मागे सोडायचे असेल तर, ५२ धावांची गरज आहे. त्याचा जोरदार फॉर्म पाहता तो नक्कीच या दोन्ही दिग्गजांना मागे सोडू शकतो.
हे ही वाचा..
सतत नो बॉल टाकत असलेल्या अर्शदीप सिंगला गौतम गंभीरने दिला ‘गुरुमंत्र’
‘करो या मरो’ सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे ३ महत्वाचे बदल! अशी असू शकते प्लेइंग ११