IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, सूर्याला IPL 2024 मध्ये खेळण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ने घातली बंदी, जाणून घ्या यामागील कारण.

Cricket 2 1

 

गेल्या 17 वर्षापासून आपल्या देशात आयपीएल T20 चे सामने खेळले जात आहेत. आयपीएल चा सर्वाधिक फायदा आपल्या देशातील युवा खेळाडूंना त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे. IPL मध्ये सतत सरावात राहिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ जगात अव्वल दर्जाचा संघ बनला आहे.

 

Cricket 2 1

आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग हे दोन्ही संघ यशस्वी संघ म्हणून ओळखले जातात कारण दोन्ही संघांनी जास्त वेळा आयपीएल ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. तर मित्रांनो मुंबई मराठी संघासाठी एक वाईट बातमी आहे मुंबई इंडियन्स संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव ला आयपीएल मध्ये खेळता येणार नाही काय आहे त्यामागील कारण ते सविस्तरपणे पाहूया.

 

मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का:-

मुंबई इंडियन्स संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव च्या घोट्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. सूर्या चे शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव ला आयपीएल मध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे नॅशनल क्रिकेट अकादमी ने आयपीएल मध्ये खेळण्यास परवानगी दिली नाही. येत्या 21 मार्च रोजी सूर्यकुमार यादव ची आणखी एक फिटनेस चाचणी होणार आहे. जर तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मान्यता नॅशनलक्रिकेट अकॅडमी कडून मिळू शकते.

 

अस्वस्थ सूर्यकुमार यादव:-

काल सूर्यकुमार यादव ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये सूर्यकुमार यादव ने ब्रेक हार्ट चे ईमोजी टाकून नॅशनल क्रिकेट अडकॅमी ने आयपीएल खेळण्यासाठी परवानगी दिली नसल्यामुळे सूर्यकुमार यादव निराश झाला आहे.

 

सूर्यकुमार यादव आयपीएल कारकीर्द:-

आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव हा पहिल्या क्रमांकावर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्या च्या घोत्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव ने यावर्षी एकही सामना खेळला नाही. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सूर्यकुमार यादव ने आतापर्यंत आयपीएलमध्ये 139 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 32.17 च्या सरासरीने आणि 1 शतकाच्या मदतीने 3249 धावा पूर्ण केल्या आहेत.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- IPL 2024:- आयपीएल च्या CSK विरुद्ध च्या पहिल्याच सामन्यासाठी किंग कोहली चा हटके लूक… बघा फोटो.

 

हे ही वाचा:- एकही झेल नाही, एकसुद्धा मिडल नाही तरीसुद्धा अर्ध्याहून अधिक संघ धावबाद झाला, जाणून घ्या या क्रिकेटमधील विक्रमाबद्दल.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *