Suryakumar Yadav Fitness Update:: मुंबई इंडियन्स टेन्शन वाढले, सूर्यकुमार यादवचे पुनरागमन लांबले;पहा कधी उतरू शकतो सूर्या मैदानावर..!

0

 

Suryakumar Yadav Fitness Update: आयपीएलच्या 17व्या हंगामातील सर्वात फेवरेट टीम मुंबई इंडियन्स आतापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाच वेळची आयपीएल टीम विजेता संघाला यंदा सूर्यकुमार यादवची कमतरता पूर्णपणे जाणवत आहे. यादवने नुकतीच हर्नियाची सर्जरी केली आहे. त्यानंतर तो मैदानात दिसला नाही. सध्या तो बेंगलोर येथे एनसीए अकॅडमीमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतोय. तो संघात केव्हा परतणार याविषयी आता रिपोर्ट समोर आला आहे.

Suryakumar Yadav Fitness Update:: मुंबई इंडियन्स टेन्शन वाढले, सूर्यकुमार यादवचे पुनरागमन लांबले;पहा कधी उतरू शकतो सूर्या मैदानावर..!

जगातील सर्वोत्तम टी-ट्वेंटी फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव आणखीन काही पुढील सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मैदानात परतण्यासाठी त्याला आणखीन काही दिवसांची वाट पाहावी लागणार आह. त्याच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स कडून सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केले होते. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ हा नवव्या स्थानावर आहे.

येत्या जून महिन्यामध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण स्पर्धेपूर्वी बीसीसीआय कोणतीही मोठी जोखीम सूर्यकुमार यादवच्या बाबतीमध्ये घेऊ इच्छित नाही. या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादवची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याला आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. सूर्यकुमार याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने मैदानात अद्याप पुर्नआगमन केले नाही.

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असून त्याच्या नावे 60 टी 20आंतरराष्ट्रीय सामन्यात चार शतके खोकल्याची नोंद आहे. त्याने 171च्या स्ट्राईक रेटने 2,141 धावा केल्या आहेत. येत्या जून महिन्यात अमेरिका व वेस्टइंडीज येथे जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये सूर्यकुमार यादवचा खूप मोठा रोल असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे तर चौथा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. हा देखील सामना मुंबईला घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळता येणार आहे.

Suryakumar Yadav Fitness Update:: मुंबई इंडियन्स टेन्शन वाढले, सूर्यकुमार यादवचे पुनरागमन लांबले;पहा कधी उतरू शकतो सूर्या मैदानावर..!

आयपीएल 2024 साठी  मुंबई इंडियन्स संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला,आकाश मधवाल, देवाल्ड ब्रेविस, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी,इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, सूर्यकुमार यादव (अद्याप तंदुरुस्त नाही), क्वेना माफाका.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave A Reply

Your email address will not be published.