VIRAL VIDEO: दुसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी सूर्या गाळतोय नेटमध्ये घाम, मारले असे शॉट की व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
रायपूर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 21 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज टीम इंडियाने नेटवर जोरदार सराव केला. यादरम्यान स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने लांब षटकार ठोकले.
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या इंस्टाग्रामवर सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एकापेक्षा एक शॉट खेळताना दिसत आहे. स्क्वेअर लेगवर त्याचा आवडता शॉट खेळण्यासाठी गुडघे टेकून सूर्याने पुढे जाऊन काही षटकार मारले. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
View this post on Instagram
टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने हैदराबादमध्ये खेळली गेलेली पहिली वनडे १२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे, जो जिंकणे दोन्ही संघांसाठी आवश्यक असेल. एकीकडे रायपूरमध्ये विजयाची नोंद करून टीम इंडियाला मालिका काबीज करायची आहे, तर दुसरीकडे मालिकेत पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडला बरोबरी साधायची आहे.
भारत वि न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड (NDvs NZ Records)

भारत आणि न्यूझीलंड वनडे इतिहासात आतापर्यंत 114 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 56, तर किवी संघाने 50 वनडे जिंकले आहेत. 7 सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत राहिला. टीम इंडियाने घरच्या मैदानावर 26 वनडे जिंकले आहेत, तर किवी टीमनेही मायदेशात 26 वनडे जिंकले आहेत.
हे ही वाचा..
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…