Cricket NewsViral Video

‘हा तर केएल राहुलचा भाऊ निघाला..” साई सुदर्शनच्या संथ फलंदाजीमुळे गुजरातला पराभवाला सामोरे जावे लागण्याने भडकले चाहते, सुदर्शन होतोय तुफान ट्रोल.

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

गुजरात टायटन्सला आयपीएल 2024 च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केल्यानंतर शुभमन गिलच्या सेनेला या संघावर मात करता आली नाही आणि त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

गुजरातला 63 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. CSK ने 206 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात गुजरात 20 षटकात 8 गडी गमावून 143 धावाच करू शकला. गुजरातच्या पराभवानंतर संघाचा डावखुरा फलंदाज आणि मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो असलेल्या साई सुदर्शनला ट्रोल केले जात आहे.

का होतोय साई सुदर्शनला ट्रोल?

गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर फलंदाज साई सुदर्शनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

चाहत्यांचे म्हणणे आहे की, सुदर्शन जितका जास्त वेळ क्रीजवर राहिला, त्याने हळू फलंदाजी केली, ज्यामुळे रनरेट वाढला आणि संघावर दबाव वाढला. शेवटी क्रिझवर राहून त्याने मोठी खेळी खेळायला हवी होती जेणेकरून सामन्यात गुजरात जवळ येऊ शकला असता पण तसे झाले नाही.गुजरातवर दबाव वाढल्यावर तो आऊट झाला, त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. सुदर्शनने 31 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली.

 CSK vs GT: शिवम दुबे आणि रचिन रवींद्र यांची तुफानी खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले गेलेले सलामीवीर रचिन रवींद्र आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेले शिवम दुबे यांनी सीएसकेसाठी स्फोटक खेळी खेळली.

रवींद्रने 20 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर शिवमने आपल्या झंझावाती खेळीने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले.
शिवमने 23 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकार मारत 51 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार गायकवाडने 36 चेंडूत 46 आणि डॅरिल मिशेलने नाबाद 24 धावा केल्या.
या खेळीच्या जोरावर सीएसकेने 6 विकेट्सवर 206 धावांची मोठी मजल मारली होती.

'हा तर केएल राहुलचा भाऊ निघाला.." साई सुदर्शनच्या संथ फलंदाजीमुळे गुजरातला पराभवाला सामोरे जावे लागण्याने भडकले चाहते, सुदर्शन होतोय तुफान ट्रोल.
आयपीएल 2024 मध्ये सीएसकेचे कर्णधारपद सोडलेल्या एमएस धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते, परंतु संधी असूनही, त्याने पुन्हा एकदा इतर फलंदाजांना पाठवून आणि स्वतः फलंदाजीला न आल्याने चाहत्यांची निराशा केली. सीझनच्या पहिल्या सामन्यातही धोनी आरसीबीविरुद्ध फलंदाजीला आला नव्हता.सोशल मीडियावर चाहत्यांचे असेही म्हणणे आहे की, धोनीला फलंदाजी करायची नसेल आणि त्याने अधिकृतपणे कर्णधारपद सोडले असेल, तर विकेटकीपिंगसाठी खेळाडू बदलण्याची काय गरज आहे. त्यांनी फक्त निवृत्ती घ्यावी.

 


====आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button