शुभमन गिल नव्हे तर सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूला म्हटले ‘गेम चेंजर’

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम टी -२० सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत १६८ धावांनी विजय मिळवला. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यातील पहिल्या डावात तुफानी शतकी खेळी करणारा शुभमन गिल सामन्याचा हिरो ठरला. मात्र सामना झाल्यानंतर, सूर्यकुमार यादवने शुभमन गिलला नव्हे तर, दुसऱ्याच खेळाडूला गेम चेंजरची उपाधी दिली आहे.
सूर्यकुमार यादवने शुभमन गिल नव्हे तर राहुल त्रिपाठीला गेम चेंजर असे म्हटले आहे. शुभमन गिलने या सामन्यात शतकी खेळी केली. मात्र सुरुवातीलाच ईशान किशन बाद झाल्यानंतर,भारतीय संघावर दबाव आला होता. त्यामुळे राहुल त्रिपाठीने आक्रमक खेळी करत भारतीय संघावर असलेला दबाव कमी केला. राहुलने या सामन्यात २२ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. त्यामुळेच सूर्यकुमार यादवने राहुल त्रिपाठीला गेम चेंजर म्हटले.


सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने राहुल त्रिपाठी सोबत एक फोटो शेअर करत गेम चेंजर असे लिहले आहे. तर शुभमन गिल सोबत फोटो शेअर करत त्याने, स्पेशल एडिशन असे लिहले आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ गडी बाद २३४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या ६६ धावांवर संपुष्टात आला.
हे ही वाचा..