T 20 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सूर्यकुमार यादवने कसोटी संघात पदार्पणाविषयी केले मोठे वक्तव्य.!
भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात गाजतोय. आधी वर्ल्डकप आणि त्यानंतर आता न्यूझीलंड दोऱ्याच्या दुसऱ्या सामन्यात सूर्याने केलेली तुफानी फलंदाजी पाहता सर्व क्रिकेटविश्व त्याचा चाहता बनला आहे. स्वतः न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सूर्याच्या या खेळीची प्रशंसा करतांना , त्याची ही खेळी अविश्वसनीय असल्याचं म्हटल आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजयी झाल्यांनतर कसोटी संघात स्थान मिळवण्याबाबत विचारले असता, दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावा करून न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या 65 धावांनी विजयाचा हिरो ठरलेल्या सूर्यकुमारला म्हणाला, ” लवकरच कसोटी संघात द्कःल होण्याचा माझा पक्का विचार आहे, माझे यापुढील पर्फोर्मंस पाहून नक्कीच कसोटी निवड समिती माझा विचार करायला भाग पडतील.
खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या सूर्यकुमारने गेल्या काही वर्षांत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला, “आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ते लाल चेंडूने केले जात होते आणि मी मुंबईत माझ्या संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होतो. मला कसोटी फॉर्मेटची चांगली जाण आहे आणि मला दीर्घ फॉरमॅट खेळण्याचाही आनंद आहे. मला आशा आहे की मला माझी टेस्ट कॅप लवकरच मिळेल.”
या सामन्यात सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. सूर्यकुमारचा खेळ पाहता दोन-तीन वर्षांपूर्वीच त्याचा राष्ट्रीय संघात समावेश व्हायला हवा होता, असे वाटते. या स्फोटक फलंदाजानेही भूतकाळात दुर्लक्ष केल्यामुळे निराश झाल्याची कबुली दिली. तो म्हणाला, “मी अनेकदा माझ्या भूतकाळाबद्दल बोलतो. जेव्हा मी माझ्या खोलीत असतो किंवा माझ्या पत्नीसोबत प्रवास करत असतो तेव्हा आपण दोन-तीन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल बोलतो. आजची परिस्थिती कशी आहे आणि तेव्हा आणि आता काय बदलले आहे याबद्दल आपण अनेकदा बोलत असतो.
सूर्यकुमार म्हणाला, “त्यावेळी नक्कीच थोडी निराशा झाली होती पण आम्ही नेहमी लक्षात ठेवले की काही सकारात्मक असेल तर त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी एक चांगला क्रिकेटर कसा बनू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तो म्हणाला, “त्यानंतर मी चांगले खाणे, सराव सत्रात पुरेसा वेळ घालवणे, योग्य वेळी झोपणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या, ज्याचे आज फळ मिळाले आहे.”
View this post on Instagram
सूर्यकुमारने कबूल केले की त्याचे काही फटके त्याला आश्चर्यचकित करतात परंतु त्याने कधीही क्रिकेटला मागे टाकण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला, “जेव्हा मी माझ्या खोलीत परत जातो आणि सामन्याचे हायलाइट्स पाहतो तेव्हा काही शॉट्स पाहून मलाही आश्चर्य वाटते. माझी कामगिरी चांगली असो वा नसो, मी सामन्याचे क्षणचित्रे नक्कीच पाहतो, पण हो हे खरे आहे की काही फटके पाहून मला आश्चर्य वाटते.
सूर्य कुमार म्हणाला, “मी कधीही खेळाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला नाही. मी कधीच विचार केला नाही की मी चांगला खेळत असेल तर इतक्या धावा कराव्यात कारण वर्तमानात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, “मी खेळापेक्षा मोठा आहे किंवा मी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे, असे एका मिनिटासाठीही तुम्हाला वाटत असेल, तर तुमची रणनीती चुकू शकते. त्यामुळे वर्तमानात राहून त्या क्षणाचाच विचार करणे महत्त्वाचे आहे.
सूर्यकुमारला विचारण्यात आले की तुम्हाला इतका आत्मविश्वास कुठून येतो, तो म्हणाला, “आत्मविश्वास नेहमीच असतो. जेव्हा तुम्ही चांगले करत असाल, तरीही तुम्ही त्याच प्रक्रियेतून जात आहात. तो म्हणाला, “सामन्याच्या दिवशीही मी 99 टक्के गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो जे मी सामान्य दिवशी करतो. जसे की जर मला जिममध्ये जायचे असेल तर मला माझे दुपारचे जेवण योग्य वेळी करावे लागेल. फक्त अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि म्हणूनच मैदानात उतरल्यावर मला बरं वाटतं.
सूर्य कुमार म्हणाला, “माझ्या मोकळ्या वेळेत मी माझ्या पत्नीसोबत वेळ शेअर करतो आणि माझ्या पालकांशी खूप बोलतो. ते कामाबद्दल बोलत नाहीत. आमच्यात खेळाबाबत कोणतीही चर्चा होत नाही. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला अशा प्रकारचे जीवन जगण्याचा आनंद मिळतो.”
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला, “अलीकडे आम्ही काही सामने एकत्र खेळलो आणि चांगली भागीदारी केली. मला त्याच्यासोबत फलंदाजीचा आनंद मिळतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला खूप धावा करायला मिळतात कारण तो खूप तंदुरुस्त खेळाडू आहे पण जेव्हा आपण मैदानाबाहेर असतो तेव्हा आपण खेळाबद्दल जास्त बोलत नाही. आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांच्या खेळाचा आदर करतो.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..