प्रामुख्याने आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु हॉकी पेक्षा आपल्या देशात क्रिकेट ला जास्त पसंती आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे.
भारताची लोकसंख्या ही जगात पहिल्या स्थानावर आहे आणि या सर्वांमधून अवघ्या 15 खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्यासाठी संधी मिळते मग तुम्हीच विचार करा प्रत्येक खेळाडूंचा किती खडतर असेल हा प्रवास.

भारतीय संघाचा स्टार आणि आक्रमक फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव ला ओळखले जाते. भारतीय संघाचा हीटर म्हणून सुद्धा ओळखले जाते. अत्यंत आक्रमक पने फलंदाजी करण्यामुळे कमी काळात सूर्यकुमार यादव चे अनेक चाहते निर्माण झाले आहेत तसेच ए बी दिविलियार्स सुद्धा सूर्यकुमार यादव चा चाहता आहे.
संपत्ती बद्दल सांगायचे झाले तर आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी मिळते. तसेच या लोकांची जीवनशैली सुद्धा अत्यंत वेगळी असते.
मीडिया रिपोर्ट च्या अंदाजे सूर्य कुमार यादव ची नेट वर्थ ही 30 करोड रुपये आहे. सूर्यकुमार यादवचा आयपीएल ते टीम इंडिया असा खडतर प्रवास झालेला आहे. यामुळेच अलीकडच्या काळात त्याची कमाई खूप वाढली आहे. सूर्यकुमार यादवची आयपीएल टीम मुंबई इंडियन्सकडून करोडोंची कमाई आणि BCCI कडून सुद्धा मोठा पगार सुद्धा मिळतो.
तसेच भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या लक्झरी जीवनशैली मुळे नेहमी चर्चेत असतो.सूर्यकुमार यादव कडे BMW 5 Series 530d M Sport, Audi 66, Range Rover, Hyundai i20, Mercedes आणि Fortuner या सारख्या गाड्यांचा संग्रह आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे सुझुकी हायाबुसा, हार्ले डेव्हिडसन यांसारख्या कार देखील कार कलेक्शन मध्ये आहेत.