सूर्यकुमार यादव: विश्वचषक २०२३ नंतर, भारतीय संघाचा टी-२० स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवने ( Suryakymar Yadav ) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळली. मात्र, प्रोटीज संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. सध्या सूर्या मैदानापासून दूर आहे आणि लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. दरम्यान, त्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हृदय स्पर्शी कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो क्रॅचच्या मदतीने चालताना दिसत आहे.
शनिवारी, स्फोटक उजव्या हाताच्या फलंदाजाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो हसत असून क्रॅचच्या मदतीने चालत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘वेलकम’ चित्रपटातील एक प्रसिद्ध संवादही ऐकू येत आहे.
व्हिडीओ सोबत सूर्यकुमार यादवने केले हृदय स्पर्शी कॅप्शन
थोड्याशा गंभीर बाबींवर, दुखापती कधीच मजेदार नसतात, परंतु मी हे गांभीर्याने घेईन आणि लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचे वचन देतो. तोपर्यंत, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुट्टीचा आनंद लुटत असाल आणि प्रत्येक दिवसात छोटे छोटे आनंद शोधत असाल.
कर्णधार म्हणून खेळतांना सूर्याची चांगली कामगिरी.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लू संघाने ऑस्ट्रेलियाचा टी-२० मालिकेत ४-१ ने पराभव केला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान संघ फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली, त्यानंतर संघातील सदस्यांनी सूर्याला आधार देऊन मैदानाबाहेर काढले. सामन्याच्या वेळी सूर्याला किरकोळ दुखापत झाली असली, तरी जेव्हा त्याने भारतात येऊन स्कॅन केले तेव्हा दुखापतीचे गांभीर्य लक्षात आले.
पहा सूर्यकुमार यादवचा व्हायरल व्हिडीओ..
View this post on Instagram
घोट्याच्या दुखापतीमुळे तो आता जवळपास महिनाभर अॅक्शनपासून दूर असेल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तो जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपले पुनर्वसन पूर्ण करेल. (Suryakymar Yadav comedy Viral Video )
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…