Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

Viral Video: आडवा पडून सुयाने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
सूर्यकुमार यादव… T20 चे सनसनाटी ज्याच्यासमोर जगातील कितीही सर्वोत्तम गोलंदाज असला तरी त्याच्या पायाखालची जमीन सरकते. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण सुर्यकुमार यादवने त्याचीच प्रचीती आजच्या त्याच्या धडाकेबाज खेळीने दिलीय. शनिवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादवने इतकी जबरदस्त फलंदाजी केली की जग थक्क झाले. सूर्याने एकाहून एक अप्रतिम शॉट्स खेळत आपल्या स्टायलिश फलंदाजीचे दर्शन सर्वांना घडवले.
45 चेंडूत सूर्याने ठोकले शानदार शतक.

त्याने येताच धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली. सूर्याने 4 चौकार-3 षटकार मारून अर्धशतक ठोकले. यानंतरही सूर्या थांबला नाही. ३६० अंशात फलंदाजी करत शानदार शतक ठोकले. त्याने 45 चेंडूत शानदार शतक ठोकून खळबळ उडवून दिली. या शतकासाठी त्याने 6 चौकार-8 षटकार मारले. सूर्याने 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी सुरू ठेवली. सूर्याने एकूण 51 चेंडूत 7 चौकार-9 षटकार मारले आणि 219.61 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 112 धावा केल्या.
आपल्या शतकीय खेळीत सूर्याने केले हे 5 मोठे विक्रम..
1.टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणारा सूर्या यावर्षी पहिला खेळाडू ठरला आहे..
भारतीय फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने या डावात 9 षटकार ठोकले. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने एका डावात 10 षटकार ठोकले. विशेष म्हणजे रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धही हे षटकार मारले होते. सूर्याने केएल राहुलचे 8 षटकारही मागे टाकले.
2.सूर्याने सर्वाधिक T20 धावा करण्याच्या बाबतीत 1500 धावांचा टप्पा पार केला.
यासह त्याने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1500 हून अधिक धावा करण्यात मुशफिकर रहीम, जेसन रॉय, लिंडल सिमन्स, फाफ डू प्लेसिस, कुसल परेरा आणि विंडीजचा अनुभवी खेळाडू किरोना पोलार्ड यांना मागे टाकले. पोलार्डने १५६९ धावा केल्या. सूर्याच्या आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1578 धावा आहेत. यामध्ये तीन शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
3.T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील पाचवा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर 4 शतकांचा विक्रम आहे. झेक प्रजासत्ताकचा डेव्हिझी, न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांच्यानंतर 3 शतके करणारा सूर्या जगातील पाचवा फलंदाज ठरला.
4. भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 शतक.
भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 शतकांच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने 35 चेंडूत शतक झळकावले. रोहितचे हे शतक 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंदूरमध्ये झाले होते.
5. सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज
सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज बनला आहे. 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीने श्रीलंकेचे कोच सुद्धा झाले प्रभावित.. ज्यावेळी मैदानावर सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होती तेव्हा सर्वांच्या नजर फक्त सूर्यावर होत्या. सुर्यकुमारने आपल्या एका खास शैली मध्ये एक षटकार ठोकला आणि स्वतः श्रीलंकेचे कोच सुद्धा हा शॉट पाहून हैराण झाले. त्यांचा एक व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सूर्याचा षटकार पाहून श्रीलंकेच्या कोचची रीएक्शण व्हायरल, पहा व्हिडीओ.
Incredible #SuryakumarYadav.
A special inning from master class @surya_14kumar. #INDvSL pic.twitter.com/S1DKLOaVmc
— Y. Satya Kumar (సత్యకుమార్) (@satyakumar_y) January 7, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: