Surykumar Yadav Injured: सूर्याचे कसोटीमध्ये पुनरागमनाचे स्वप्न आणखी लांबणार? बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून या कारणामुळे होणार बाहेर..

0
30
Surykumar Yadav Injured: कसोटीमध्ये खेळण्याचे सूर्याचे स्वप्न आणखी लांबणार? बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून या कारणामुळे होणार बाहेर..

Surykumar Yadav Injured:  तब्बल 19 महिन्यांनंतर सूर्यकुमार यादवच्या भारतीय कसोटी संघात पुनरागमनाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. बुची बाबू स्पर्धेत क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये सूर्यकुमारला टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळायचे आहे. मात्र, हाताला झालेल्या दुखापतीनंतर या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमारच्या खेळण्यावर साशंकता आहे.

INDvsSL: सूर्यकुमार यादवला एकदिवशीय संघात जागा का मिळाली नाही? मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने केला खुलासा..!

Surykumar Yadav Injured: मोठ्या स्पर्धेआधी सुर्यकुमार यादव जखमी, बंगलादेशविरुद्धच्या कसोटीमालिकेतून पडणार बाहेर?

TNCA XI विरुद्ध MUMBAI क्रिकेट असोसिएशनकडून खेळणारा सूर्यकुमार सामन्याच्या तिसऱ्या डावात लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. मुशीर खानच्या चेंडूवर प्रदोष रंजन पॉलने लेग साइडवर चेंडू खेळला. चेंडू रोखण्यासाठी सूर्यकुमारने दोन्ही हातांनी डायव्हिंग केले. पण चेंडू त्याला पकडता आला नाही. या प्रयत्नात त्यांच्या हाताला दुखापत झाली. सूर्यकुमारला तत्काळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मैदानाबाहेर नेण्यात आले. बीसीसीआयने अद्याप सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत काहीही सांगितलेले नाही.

 Rahul Dravid’ Son samit in team india: राहुल द्रविडच्या मुलाची अखेर टीम इंडियामध्ये निवड, ऑस्ट्रोलियाविरुद्ध करणार पदार्पण..

सूर्यकुमारसोबत सामन्यात खेळणारे सरफराज खान आणि श्रेयस अय्यरही फलंदाजीत अपयशी ठरले. TNCA XI विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशनचा 286 धावांनी पराभव झाला आहे. भारताचा बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Surykumar Yadav Injured: कसोटीमध्ये खेळण्याचे सूर्याचे स्वप्न आणखी लांबणार? बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून या कारणामुळे होणार बाहेर..

पहिल्या डावात टीएनसीए इलेव्हनने केलेल्या 379 धावांच्या प्रत्युत्तरात एमसीएला केवळ 156 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात 510 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्यासमोर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा संघ केवळ 223 धावांत गारद झाला. टीएनसीए इलेव्हनच्या आर साई किशोरने दुसऱ्या डावात पाच विकेटसह आठ गडी राखून सामना संपवला. कसोटीत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अय्यरला या सामन्यात केवळ 2 आणि 22 धावा करता आल्या. कर्णधार सर्फराजने पहिल्या डावात 6 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात चार चेंडूत शून्यावर बाद झाला.


हे ही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here