हार्दिक पंड्याला शेवटच्या षटकात सुर्यकुमार यादवने दिलेल्या या सल्ल्यामुळे पलटला खेळ, टीम इंडियाने 2 धावांनी जिंकला हरत असलेला गेम..
हार्दिक पंड्याला शेवटच्या षटकात सुर्यकुमार यादवने दिलेल्या या सल्ल्यामुळे पलटला खेळ, टीम इंडियाने 2 धावांनी जिंकला हरत असलेला गेम..
IND vs SL: टीम इंडियाने नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. ३ जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा ब्रिगेडने शानदार विजय नोंदवला. भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला. भारताला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्यात कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 163 धावाचा हलका स्कोर केला प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 160 धावा करू शकला.
सूर्यामुळे भारताने सामना जिंकला: खरं तर, भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने अक्षर पटेलला शेवटचे षटक दिले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण डेथ ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाजाला चेंडू देणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडीने मारल्यासारखे होते पण तो कर्णधार हार्दिकचा निर्णय नव्हता तर सूर्यकुमार यादवचा होता .

आणि सूर्य ने ते सिद्ध करून दाखवले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सूर्या ‘देखा मैने कहा था ना की ये कर के दिखायेंगा ’ असे हावभाव करत आहे आणि या निर्णयाने सर्वाना थक्क केले पण विजयाचा रथ भारताने चालूच ठेवला.